कन्नड -मुरुमाने भरलेल्या ट्रक्टरची धडक लागून शाळकरी विद्यार्थीनीचा दबुन मृत्यू झाल्याची घटना गारमाथावरील बहिरगाव रोडवर घडली .
याबाबत अधिक माहिती अशी की विठ्ठलपूर येथील श्रध्दा सोमीनाथ पिंपळे ही तालुक्यातील बनशेद्रा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात सातवी वर्गात शिक्षण घेत होती . दिनांक 23 सप्टेंबर रोजी विद्यालयातून श्रध्दा सोमीनाथ पिंपळे वय 13 वर्ष व तिची मैत्रीण विद्यालयातून सायकल वरून विठ्ठलपूर कडे घरी जात असताना गारमाथया जववळील बहिरगाव रोडवर मुरुमाने भरलेल्या ट्रक्टर ने श्रध्दा पिंपळे हीस जोराची धडक दिल्याने श्रध्दा ट्रक्टर खाली दबली ग्रामस्थांनी तात्काळ श्रध्दास कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत कोंडेकर यांनी श्रध्दास तपासले असता मृत्यू घोषित केले हे वृत्त लिहीत असे पर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .