संशोधन कार्यात गांभीर्य महत्वाचे – डॉ. बारहाते
देशातील विविध राज्यांतील रिसर्च स्कॉलर्स चा सहभाग
नवीन परिमाणे शोधण्यासाठी आणि विद्यमान ज्ञानात अधिक भर टाकण्यासाठी संशोधन केले जाते. जेव्हा संशोधन अभ्यासक संशोधनासारखे महत्वाचे काम हाती घेतात तेव्हा संशोधनाची प्रत्येक प्रक्रिया अत्यंत गांभीर्याने पार पाडली गेली पाहिजे असे सी.पी. अँड बेरार ई.एस. कॉलेजचे , प्राचार्य, डॉ. मिलिंद बारहाते, यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले. 20 ते 26 जून दरम्यान प्लेस ऑफ हायर लर्निंग अँड रिसर्च, सी.पी. अँड बेरार ई.एस. कॉलेज, तुळशीबाग महाल तर्फे एक आठवडाभर चालणारी ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्याच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. डॉ. बारहाते पुढे म्हणाले की, कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱ्या संशोधन तज्ञांना मोठा अनुभव असून विद्यार्थ्यांना अश्या कार्यशाळांमधून जास्तीत जास्त लाभ होणे आमचा उदेष्य आहे.
जबलपूर येथील डॉ. सुनील पाहवा, यांनी प्लॅगॅरिजम वर सादरीकरण करताना सांगितलं की, संशोधनात्मक लेखनात साहित्यिक/ वाङ्मय चौर्य टाळणे महत्त्वाचे आहे कारण असे केल्यास प्लॅगॅरिजम टेस्ट मध्ये ते धरल्या जाऊन त्याची मोठी किंमत मोजावी लागते. या मुळे विद्यार्थ्यांच्या किंवा व्यावसायिक संशोधकांच्या विश्वासार्हतेवर विपरित परिणाम होऊ शकतो. सच्चेपणा आणि चिकाटी वर भर देण्यास त्यांनी सांगितले.
संशोधनाचा अर्थ आणि उद्दिष्टापासून ते संशोधन प्रक्रिया, संशोधन रचना, नमुन्याचा आकार, डेटा संकलन, संदर्भग्रंथ, आयसीटी कौशल्ये, गृहीतकांचे सूत्रीकरण, चाचणी, त्रुटी, साहित्यिक चोरी इत्यादी विविध विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ.निखिल आटाळे, डॉ.दिव्या लाखेरे, डॉ.विनोद दोंदरवार, विष्णू ठाकरे, डॉ.मेधा कानेटकर, डॉ.प्रिती धार्मिक, डॉ.आशिष लिंगे, डॉ.दिनी मेनन, डॉ.सुनील पाहवा, आलेख चोरसिया, डॉ.रेखा शर्मा आदी तज्ज्ञ मंडळीने विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
.
आयोजन सचिव, डॉ. मेधा कानेटकर, यांनी सांगितले की कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि भारतभरातील 40 हून अधिक संशोधकांनी कार्यशाळेला हजेरी लावली. दिल्ली, मुंबई, कोकण, मध्यप्रदेश आणि आसपासच्या भागातून रिसर्च स्कॉलर्स ने सहभाग दर्शवला.