Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

धक्कादायक : कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग

पुणे : दिवस रात्र कोरोणाशी लढत रोग्णाची सेवा करत आसतात डॉक्टर ,त्यात महिला डॉक्टर पण त्याच्या बराबरीने काम करत आसतात. मात्र पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये एका महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये एका 25 वर्षीय महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणच्या दोन डॉक्टरांनी या महिला डॉक्टराचा विनयभंग केल्याचं समोर आलं आहे.

योगेश भद्रा आणि अजय बागलकोट अशी विनयभंग करण्या दोन्ही डॉक्टरची नावं आहे. गेल्या एका महिन्यापासून हे दोन्ही डॉक्टर त्या महिलेला उद्देशून अश्लील बोलत होते. काही दिवस त्या महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर त्या दोघांनी तिला जास्त प्रमाणात त्रास देण्यास सुरुवात केली.

यामुळे अखेर त्या महिला डॉक्टरने दोघांविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डॉक्टरांची नेमणूक एका खासगी एजन्सीमार्फत करण्यात आली होती. दरम्यान अद्याप पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close