औरंगाबाद येथे फार्मासिस्ट-केमिस्ट मेळावा संपन्न
औरंगाबाद/ प्रतीनीधी
औरंगाबाद जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे वतीने औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील फार्मासिस्ट आणि केमिस्ट यांचा मेळावा हॉटेल अतिथी येथे आयोजित केला होता. सभेला मार्गदर्शन करतानाअखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष श्री.जगन्नाथ ऊर्फ आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले की, ऑनलाइन आणि कार्पोरेट कंपन्या यामुळे औषध विक्रीहा सेवे ऐवजी व्यवसाय झाला आहे. डिस्काऊंट च्या प्रलोभनात रुग्णांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण होत आहे.या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता आम्हाला रुग्णांना मूल्यवर्धित सेवा द्याव्या लागतील. बजेट रुग्णाचे आणि औषधी आमची या दृष्टीने रुग्णांना त्यांच्या बजेट मधील ब्रँडची औषधे आम्हाला उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. तरच आम्ही या स्पर्धेत टिकू शकू असेही त्यांनी यावेळी सांगितले. औषध व्यवसाय क्षेत्रात मोठ्या भांडवलदारांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होत आहे. त्यांच्याशी स्पर्धेत टिकायचे असेल तर एक एकट्याने व्यवसाय न करता एकत्रित येऊन मोठी रिटेल फार्मसी स्टोअर उघडावी लागतील, बल्क परचेस करण्यासाठी मोठ्या होलसेल फर्म तयार कराव्या लागतील तरच बार्गेनिंग पॉवर वाढू शकेल.औषध विक्रेत्यांनी आधुनिक तंत्र तंत्रज्ञानाचा वापर करावा.स्पर्धेला स्पर्धेने तोंड द्यावे लागेल रुग्णांच्या खरेदीचे बजेट नुसार औषधे द्यावी लागतील ऑनलाइन आणि कार्पोरेट कम्पनी यामुळे औषध हा सेवे ऐवजी व्यवसाय झाला आहे. आणि या व्यवसायातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता आम्हाला रुग्णांना मूल्यवर्धित सेवा द्याव्या लागतील. बजेट रुग्णाचे आणि औषधी आमची या दृष्टीने रुग्णांना त्यांच्या बजेट मधील ब्रँडची औषधे आम्हाला उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. म्हणजे *बजेट तुमचे औषधे आमची* ही संकल्पना राबवावी लागेल. दुकानात ग्राहक स्नेही वातावरण असले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य औषध परिषद निवडणूक 2022 साठी MSCDA पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याची विनंती मराठवाडा झोनचे उमेदवार श्री.मनोहर सोपान कोरे यांनी केली. यावेळी व्यासपीठावर राज्य संघटनेचे उपाध्यक्ष अरुण बरकसे, पी.आर.ओ. अजित पारख मराठवाडा झोनचे अध्यक्ष चंद्रशेखर गाडे,सचिव कुशल जैन उपाध्यक्ष दीपक कोठारी, दीपक पावडे, सुधीर मंत्री, जालना जिल्हा अध्यक्ष साईनाथ पवार, MSMRA चे अध्यक्ष स्वामी औरंगाबाद जिल्हा सचिव विनोद लोहाडे, फार्मसी कौन्सिल उमेदवार मनोहर कोरे अन्य मान्यवर उपस्थित होते.सूत्र संचलन प्रविण लोहाडे यांनी केले आणि आभार विनोद लोहाडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष अझहर खान, सहसचिव नितिन देशमुख,सागर पाटील कोषाध्यक्ष निखिल सारडा, कार्यकारिणी सदस्य किरण जोशी, कपिल टिबडीवाला, रईस शेख सुनील देशमुख,अशोक धस यांच्यासह सर्व तालुका प्रतिनिधी आणि असंख्य सभासदांचे सहकार्य लाभले.