मुकादम तीन दिवस पोलिस कोठडीच्या गव्हाणीत
माजलगावा /प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ऊसतोड मजुर म्हणून छत्रपती सह.साखर कारखान्याकरीता संबंधीत ऊसतोड मुकादमाकडुन उचल घेतलेल्या एका पति,पत्नीने तालुक्यातील गोविंदवाडी येथील ऊसतोड मुकादम दत्ता महादेव जाधवर याच्याकडुन उचल घेतली होती.यामुळे ते ऊसतोड मजुर म्हणून छत्रपती सह.सा.का.परिसरातील बैलगाडी यार्डातील झोपडीत १मे रविवार रोजीच्या दुपारी ३वा.दरम्यानच्या वामकुक्षी घेत असताना लिंग पिसाट दत्ता महादेव जाधवर तेथे आला आणि २५वर्षीय विवाहितेला शारिरीक संबंधाची मागणी तीच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन वारंवार केली होती त्याप्रमाणे केली होती.मात्र त्या मयत विवाहितेन दत्ता महादेव जाधवर याच्या सतत च्या अनैतिक शारिरीक संबंधाच्या मागणीला वैतागुन गळफास घेत आत्महत्त्या केली. यावरुन बालासाहेब ज्ञानोबा केकाण यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्त्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी भादंवि.कलम ३०६नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपास अधिकारी सपोनि.विजयसिंह जोनवाल यांनी १मे रविवार रोजी च्या रात्रीच अटक करून त्याला २मे सोमवार रोजी न्यायालयात हजर केले होते.त्यावर न्यायालयाने दत्ता जाधवर ला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.