Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

हळदा घाटातील ट्रॅक्टर अपघातात सोयगांवच्या तरुणाचा मृत्यू


सोयगांव / प्रतिनिधी हळदा घाटातून खडी भरलेला ट्रॅक्टर घेऊन जात असतांना झालेल्या अपघातात सोयगांव येथील  तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि १९ रविवारी दुपार घडली.       अमितसिंग अजयसिंग हजारी (वय २५ )असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.अमितसिंग दुपारी सोयगांव येथून स्वतःच्या ट्रॅक्टर मधून खडी घेऊन जात होता. हळदा घाटातील वेताळवाडी किल्ल्याजवळशेवटच्या चढनवर  ट्रॅक्टरचा मौसम तुटल्याने मागे येऊन ट्रॅक्टर पलटी झाले यात अमितसिंगचा दबून मृत्यू झाला. माहिती मिळताच सोयगांव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले. सोयगांव  ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. तरुणांची मोठी गर्दी रुग्णालय परिसरात झाली होती. पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, उपनिरीक्षक श्री पंडित,श्री बनसोडे यांनी  पंचनामा केला. या  घटनेची सोयगांव पोलीस ठाण्यात  नोंद करण्यात आली आहे.रविवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई, आजी, आजोबा एक भाऊ असा परिवार आहे..

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close