Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

शिदोंळ येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सोयगाव/ प्रतिनिधी……सतत नापिक व ह्या वर्षी पडलेला अतिपावसाने कपाशी पिक वाया गेल्याने कर्ज कसे फीटणार ह्या चितेंत एका कर्जबाजारी शेतकरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार (ता. १९)रोजी तालुक्यातील कींन्ही  शिवारात  सकाळी अकराच्या सुमारास घडली…भगवान भिवा सोनवणे( वय ६०) रा शिदोंळ असे आत्महत्या केलेल्या शेतकरीचे नाव आहे
मृत भगवान सोनवणे यांची शेती कीन्ही शिवारात गट नं.१४१ मध्ये चार एकर असुन त्या शेतात ह्या वर्षी कपाशीची लागवड करण्यात आली होती सुरुवातीपासुन पावसाने चांगली सुरुवात असल्याने कपाशी पिके जोमात होती ह्यावर्षी मोठ्या प्रमाणावर उत्पादन येणार ह्या भरवशावर अशी आशा होती परंतु गेल्या वीस ते पंचवीस दीवसापासुन ढगफुटी तसेच मुसळधार पावसाने हा परीसर झोडपुन काढला एकसारखा पाऊस असल्याने होत्याचे नव्हते करुन टाकले आणि पावसामुळे कपाशी पिक वाया गेले असुन शेतीसाठी लागलेलि खर्च देखील निघणे अवघड झाले आहे भगवान सोनवणे ह्यांची कपाशी पिक देखील वाया गेल्याने सोसायटीचे बावन्न हजार तसेच बॅंक ऑफ महाराष्ट्र चे एक लाख व इतर दोन लाख कर्ज कसे फीटणार व घरचा प्रपंच कसा चालवायचा ह्या चितेने सकाळी शेतात जातो असे सांगुन शेतीतील झाडाला गळफास घेतला काही  वेळाने पुतण्या बापु सोनवणे हा शेतात आल्यावर प्रथम त्याने  पाहीले दरम्यान ही घटना घरच्या मंडळींना सांगितली घटनास्थळी जावुन पोलीसांनी पंचनाम केला असुन भगवान सोनवणे यांची उत्तरीय तपासणी बनोटी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रतिमा मोरे यांनी केली संध्याकाळी सात वाजता येथील स्मशानभूमीत अत्यंसस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहेसोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर गिते जमादार राजेंद्र बर्डे,दीलीप तडवी,विकास दुबेले,श्रीकांत तळेगावकर आदी तपास करीत आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close