Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सरकारने काढलेले फसवे जिआर मराठा क्रांती ठोक मोर्चाने फाडून उधळले मराठा कार्यकर्ते आक्रमक

औरंगाबाद / प्रतिनीधी
मराठा समाजासाठी फसवे शासन निर्णय जिआर काढून फसवणूक केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने दि.१९ आँगस्ट रोजी दुपारी शहरातील पैठण गेट परिसरात शासन निर्णय जिआर फाडून फिरकावत सरकारचा निषेध करण्यात आला.मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
केंद्र व राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूक
करत असुन विनाकारन मराठा समाजाला राजकीय पुढारी वेठीस धरत आहेत.येणाऱ्या काळात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने दोन्हीही सरकारच्या विरोधात लवकर दिल्लीत व मुंबईत मोठे जन आंदोलन उभारणार असुन त्याची तयारी आम्ही सुरू केली असल्याचा इशाराही समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला.
सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी फसवे जिआर काढून मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे.समाजाची फसवणूक करणाऱ्या फसव्या सरकारचा (जिआर ) शासन निर्णय फाडून ठोक मोर्चा कडून निषेध व्यक्त करण्यात आला.क्रांती चौक पोलीसांनी समन्वयक रमेश केरे पाटील,किरण काळे पाटील,राहुल पाटील,मनोज मुरदारे,कृष्णा उघडे,स्वप्निल चाळक,अप्पासाहेब जाधव,अशोक गाढे या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक करून नंतर सोडुन देण्यात आले.सरकार पोलीस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर दडपशाहीचा प्रयत्न करत असल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चा व समाजातील सर्व स्तरातून सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close