Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

तरुणांनी आध्यात्मिकतेकडे वळणे गरजेचे आहे… ह.भ.प.लक्ष्मण उबाळे

वडीगोद्री/आर व्हि. छिल्लारे

काला हा तीन प्रकारचा असतो.या काल्याच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील नागरिक एकत्र येतात.यातून माणसाला माणूस बनवण्याचा प्रयत्न केला जातो.आज चंगळवादाच्या दुनियेत तरुण पिढी वाहत जाताना दिसत आहे.या पिढीला आध्यात्मिक आवड निर्माण होणे आवश्यक आहे.तरच संस्कृती जिवंत राहणार आहे,असे प्रबोधन ह.भ.प.लक्ष्मण उबाळे यांनी केले.

अंबड तालुक्यातील सौंदलगाव येथील श्री महंत ऐतवारपुरी महाराज आनंद आश्रम येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगी ते बोलत होते.या सप्ताहाचा प्रारंभ हा दि.२० जून रोजी ते सांगता ही २४ जून रोजी करण्यात आली.

पुढे बोलताना उबाळे म्हणाले की,श्रीकृष्ण यांनी कधीही कुठल्याही प्रकारचा मतभेद,जातीभेद केला नाही.सवंगडी याना घेऊन यमुना तीरावर सर्वाना एकत्र करून सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या.अन तो प्रसाद सर्वाना वाटला.यातुन एक सामाजिक एकोप्याची शिकवण दिसून येते.या शिकवणीची आज समाजाला खूप आवश्यकता आहे,असे ते म्हणाले.

यावेळी सप्ताहाच्या काळात गुरुचरित्र पारायण,काकडा,गाथा भजन,हरिपाठ,कीर्तन अशी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.तसेच या काळात ऐतवारपुरी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून स्थापना करण्यात आली.यावेळी अंतरवाली सराटी,धाकलगाव,दोदडगाव,सौंदलगाव,वडीगोद्री तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी या सप्ताह्याचा आनंद घेतला.

या सप्ताहासाठी दादासाहेब कदम,भारत उंडे,दामोदर शेंडगे,बंकट राजपुत,जालामसिंग राजपूत,प्रभाकर पुरी महाराज,बाबुराव खोमणे,कैलास नावडे,कानिफनाथ सावंत,संजय पवळ,जगन्नाथ नावडे,दशरथ तांबे,सखाराम नावडे,केशव चेपटे,विठ्ठल पवार,भुजंग खिल्लारे यांच्या सह तरुण मंडळी यांनी परिश्रम घेतले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close