जुगार अड्ड्यावर पिशोर पोलीसांची धडक कारवाई एक लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त
कन्नड ( प्रतिनिधी ) तालुक्यातील खेडी येथे झन्ना मन्ना चालणारया जुगार अड्ड्यावर पिशोर पोलीसांनी धाड टाकून नऊ जणा विरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांच्या जवळून सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पिशोर पोलीसांना यश आले आहे .पिशोर पोलीसांच्या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणारयाचे धाबे चांगलेच दणाणले आहे .याबाबत पिशोर पोलीसांनी दिलेली माहिती अशी कीखेडी येथे झन्ना मन्ना जुगारांचा अड्डा सुरू असल्यांची माहिती पिशोरचे साहय्यक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन त्यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सापळा रचून मोठ्या शिताफीने दिनांक ८ फेब्रुवारी रोजी मौजे खेडी येथील शेख शगीर शेख अहमद रा.खेडी यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली काही लोक पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळ खेळत असताना दिसले पोलीसांनी छापा मारुन जुगार खेळ खेळणाऱ्या मतीन मजिद कच्ची वय ३१ वर्ष रा.मिझ कॉलनी सिल्लोड , शेख अलीम शेख चाँद वय ३२ वर्षरा.स्नेहनगर सिल्लोड , अजिनाथ उखर्ड गायकवाड वय ३२ वर्ष , सुरेश देवाजी मुरमुडे वय ४०वर्ष दोन्ही रा.दिगाव ता.कन्नड , श्रीकांत काशिनाथ शिंदे वय ३६ वर्ष , पाशु खाजु पठाण वय३२ वर्ष दोन्ही रा.देऊळगाव बाजार ता.सिल्लोड , शेख मुजाहिद शेख साहेब वय ३२ वर्ष , शेख कलीम शेख बशीर वय ४० वर्ष दोन्ही रा.खेडी ता.कन्नड , शेख लतीफ शेख रशीद वय ३० वर्ष रा.वैतागवाडी पिशोर ता.कन्नड यांना जागीच पकडुन त्यांच्याकडुन नगदी ११,६००/रुपये सह सहा मोटार सायकल, सहा मोबाईल असा एकुन १,७३,१००/रुपयाचा मुद्देमाल जप्त करून वरील नऊ इसमांना ताब्यात घेतले असुन पोना डकले यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुध्द पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोना/विलास सोनवणे हे करीत आहेत.सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक निमीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक पवन बनसोड , उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक कोमलशिंदे पोहेका सुनिल भिवसने,पोना सोपान डवले ,,लालचंद नागलोद, गजानन कराळे पोअं./संजय लगड,दिनेश खेडकर,संदिप चव्हाण,कल्याणसिंग बहुरे यांनी परिश्रम घेतले .