Subscribe to our Newsletter
Loading
Uncategorized

औरंगाबादकरांनो सावधान ‘तो’ मॅसेज चुकीचा, फॉरवर्ड कराल तर होईल कारवाई

औरंगाबाद कलेक्टरकडून सूचना’ शिर्षकाखालील संदेश चुकीचा

औरंगाबाद (mh20live network ) दि.2- जिल्ह्यातील काही व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘औरंगाबाद कलेक्टरकडून सूचना’ या शिर्षकाखाली लॉकडाऊनबाबत सूचना देणारा संदेश मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड करण्यात येत आहे. या संदेशात वृत्तपत्र बंद करा, शेजाऱ्यांशी संवाद बंद, बेकरी सामान बंद आदी विविध दिशाभूल करणाऱ्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.


असा कोणताही संदेश जिल्हा माहिती कार्यालय औरंगाबादतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. हा संदेश नागरिकांमध्ये गैरसमज पसरविणारा असून नागरिकांनी असा संदेश कोणालाही फॉरवर्ड करू नये. कोणी फॉरवर्ड करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचना जिल्हा माहिती कार्यालयाचे ट्टिवटर हँडल @InfoAurangabad आणि फेसबुक पेज AurangabadDIO वर वेळोवेळी देण्यात येतात, तसेच वृत्तपत्रांमधून प्रकाशित करण्यासाठी पाठविण्यात येतात, असे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी कळविले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close