Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात मनुष्यबळ अधिकार्यांनी साधला ऑनलाईन एक्सपर्ट टॉक च्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांशी संवाद

संपूर्ण महाराष्ट्रातून झाले विद्यार्थी सहभागी
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””'”
उस्मानाबाद-(7/10/2020) बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच स्वतःलाही बदलले पाहिजे , पण सद्यपरिस्थितीत विद्यार्थ्यांसमोर अनेक आवाहन असून त्यातीलच एक म्हणजे जॉब नियुक्तीसाठी आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करणे .विद्यार्थ्यांची नेमकी हीच गरज ओळखून येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने “एच आर इंटर्व्ह्यू प्रिपरेशन ” या विषयावर एक्सपर्ट टॉक चे आयोजन केले होते . तज्ञ मार्गदर्शक म्हणून स्क्वाड इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनिष झा यांना निमंत्रित करण्यात आले होते. ह्युमन रिसोर्स म्हणजेच HR मुलाखाती हा कंपनीतील भरतीप्रक्रीयेचा एक महत्वाचा टप्पा आहे आणि याची माहिती घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 363 विद्यार्थी उपस्थित होते . यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की ” विद्यार्थी अभ्यासा मध्ये मेरीट मध्ये असले तरीही व्यक्तिमत्व विकासाची जी कौशल्ये आत्मसात करावी लागतात त्यात आमचे विद्यार्थी मागे पडू नये म्हणून या एक्सपर्ट टॉक चे आयोजन केले आहे. आणि यासाठी पुणे ,नांदेड सारख्या मेट्रोपोलिटीयन शहरांमधून सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला याचा आम्हाला आनंद आहे . यावेळी श्री मनिष झा यांनी नेतृत्व क्षमता वाढविण्यासाठी कुठल्या बाबीवर अधिक लक्ष केंद्रित करावे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले . स्वतःमधील बलस्थाने, कमकुवत गोष्टी अगोदर शोधून त्यावर आपली कठोर मेहनत घेतली की यशाला सहज गवसणी घालता येते. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नावर श्री . मनीष झा यांनी समाधानकारक उत्तरे दिली.आॅनलाईंन कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. अनिरूद्ध देशपांडे ,प्रा.अजिम शेख , प्रा.नवले , प्रा. प्रदिप पवार आणि प्रा.आर.ए.दंडनाईक यांनी काम पाहिले .

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close