Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

महिंद्रा’ने महाराष्ट्रात सुरू केली ‘कृष-ई’ केंद्रे

महिंद्राने महाराष्ट्रात सुरू केली कृष-ई केंद्रे

औरंगाबाद, 2 ऑक्टोबर :  ‘महिंद्रा’च्या नव्या ‘फार्मिंग अॅज अ सर्व्हिस’ (एफएएएस) या व्यवसायाचा एक भाग म्हणून, महिंद्रा अॅंड महिंद्रा लि. या कंपनीच्या कृषि उपकरणे विभागाने महाराष्ट्रात आज ‘कृष-ई’ केंद्रे कार्यान्वित केली. महिंद्रा अॅंड महिंद्रा लि. ही 19.4 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या महिंद्रा उद्योगसमुहातील एक प्रमुख कंपनी आहे.

‘‘एक्सपर्ट तंत्र, नवीन उपाय, परिणाम दर्शविते’’, असे घोषवाक्य असणाऱ्या ‘कृष-ई’च्या व्यवसायातून तंत्रज्ञानाद्वारे चालणाऱ्या प्रगत, परवडणाऱ्या व सुलभ सेवा शेतकऱ्यांना देण्यात येतील. पिकांच्या संपूर्ण हंगामात डिजिटल सेवा देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे ‘कृष-ई’चे उद्दिष्ट आहे. या सेवांमध्ये अॅग्रोनॉमीविषयक सल्ला, प्रगत कृषि उपकरणे भाडेतत्वावर देणे आणि नवीन युगातील शेतीतील अचूक उपाययोजना यांचा समावेश आहे. शेतीतील एकंदरीत खर्च कमी करणे, पिकांचे उत्पादन वाढवणे व त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे साध्य करण्यावर यामध्ये भर दिला जाणार आहे.

आज महिंद्रा समूह आपला 75वा वर्धापनदिनदेखील साजरा करीत आहे. या समुहाच्या कारकीर्दीची सुरुवात महाराष्ट्रातून झाली होती. त्या निमित्ताने, पहिली ‘कृष-ई’ केंद्रेही औरंगाबाद व बारामती येथे उभारण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील जालना, वर्धा, नांदेड, पुणे, दौंड व सोलापूर या सहा ठिकाणी ‘कृष-ई’ केंद्रे लवकरच कार्यान्वित होतील.

देशातील इतर राज्यांमध्येही ‘कृष-ई’ केंद्रे लवकरच टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. शेतकरी आपल्या शेतात व  या ‘कृष-ई’ केंद्रांवर वैयक्तिकृत सेवांचा लाभ घेऊ शकतील. आमच्या ‘कृष-ई’ सहाय्यकांशी संपर्क साधण्यासाठी ते ‘कॉल सेंटर’चा आणि ‘कृष-ई अॅप्स’चा उपयोग करू शकतील.

महिंद्रा अॅंड महिंद्रा लि. या कंपनीच्या कृषि उपकरणे विभागाचे (एफईएस) प्रमुख हेमंत सिक्का या ऐतिहासिक  प्रसंगी म्हणाले, ‘’कृषि क्षेत्रातील गुंतवणूक व तंत्रज्ञानातील नाविन्यता यांमुळे भारतात कृषि उत्पादन वाढले असले, तरी उत्पादकता आणि शेतीतील उत्पन्न यांच्या वाढीसाठी अजून बराच वाव आहे. ‘महिंद्रा’मध्ये आम्हाला या संदर्भात मोठे काम करायचे आहे आणि शेती करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणायचे आहेत. मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीकडे लक्ष ठेवून त्यांना स्पर्धात्मक दरांमध्ये तंत्रज्ञान पुरवणे आणि उन्नतीसाठी सक्षम बनवणे हे आमचे ध्येय आहे.’’ 

सिक्का पुढे म्हणाले, ‘’महिंद्रा समुहाच्या 75 व्या वर्धापनदिनी ‘कृष-ई’चा पहिला सेट कार्यान्वित होत असल्याने आम्ही आनंदित आहोत. भारतात नव्या डिजिटल युगानुसार शेती करण्याची कल्पना ‘कृष-ई’ या नाविन्यपूर्ण व्यावसायिक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्याचे ‘कृष-ई’चे ध्येय आहे. याकरीता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) यांच्या सहाय्याने शेतीतील तंत्रे अधिक प्रभावीपणे विकसीत करून ती त्यांना उपलब्ध करून देणे आणि वाढती उत्पादकता व नफा वाढवण्याच्या दृष्टीने परवडणारी व सहजी उपलब्ध होणारी डिजिटल सोल्युशन्स त्यांना पुरवणे असे ‘कृष-ई’चे नियोजन आहे. ‘कृष-ई’च्या माध्यमातून ‘महिंद्रा’मध्ये आम्ही शेतकऱ्यांशी दृढ संबंध निर्माण करीत आहोत व त्यांना आमच्याशी जोडून घेत आहोत.’’

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close