Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी पुणे येथे संपन्न

“गाव पातळीवर सभासद नोंदनी करण्याचा संघटना कार्यकर्त्यांचा निर्धार”.


पुणे :महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना महाराष्ट्र ही राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये असंघटीत क्षेत्रातील कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करीत आहे.
महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी *”काकासाहेब शिंगारे सभागृह “पुणे येथे घेण्यात आली या वेळी प्रदेश पदाधिकारी व१०जिल्ह्यातून आलेले जिल्हा अध्यक्ष,जिल्हाचिटणीस,उपस्थित होते.
श्री प्रभू भगवान वीश्वकर्मा प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन बैठकीस सुरुवात झाली.

१) शहीद जवान,विविध क्षेत्रातील निधन झालेल्या मान्यवराना, कोरोना महामारीत मृत्यु मुखी पडलेल्या कामगार बांधवांना श्रंधाजली वाहण्यात आली.
२)मागिल वर्षातील संघटनेने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.
3)प्रदेश पदाधीकारी यांनी राज्य भर प्रवास करण्याचे ठरले.
४)संघटनेचा राज्यभर विस्तार व वाढीसाठी सर्वानी ऐकजुटीने ( गाव ) हे केंद्रबिंदू मानुन गावपातळीवर कामगारांची नोंद्नी करण्याचा निर्धार केला..
बैठकीच्या अध्यक्ष स्थानी प्रदेश अध्यक्ष श्री.गणेश भोसले होते, .प्रदेश सरचिटणीस श्री.शरद पंडीत यांनी बैठकीतील सर्व मुद्द्यावर, सविस्तर विवेचन केले २०२१ या वर्षातील तालुका, जिल्हा व प्रदेश स्तरावर करावयाचा कार्यक्रमाची माहिती दिली.मा.श्री.आप्पा यांनी मार्गदर्शन केल्यानंतर बैठकीचा समारोप झाला.
या बैठकीस मीना पंडीत, राजकुमार सुतार,प्रभाकर शिंदे,केशव खरात,स्मिता कोरडे, सुवर्णा कोंढाळकर,विठ्ठल मचे,दत्तात्रय मटाले ,जावेद भाई,दादाराव तुपे, नामदेव जाधव,नवनाथ निमसे,रमेश गुडीवाल ,उषा जाधव या कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close