Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

एम.एम.आर.डी.ए. कडील रिक्त पदांच्या भरतीकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

ताज्या बातम्या साठी बघत राहा www.mh20live.com

अलिबाग, जि.रायगड – दि.01 :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर कार्यालय, मुंबई यांच्यामार्फत कुशल/अकुशल उमेदवारांसाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दि. 08 ते 12 जुलै 2020 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत फक्त कौशल्य विकास व उद्योजकता या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
या मेळाव्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, (M.M.R.D.A.) वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई- यांच्याकडील विविध प्रकारची पदे भरावयाची आहेत. या पदांमध्ये गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सींग करणारे), फिटर (बार बेंडिंग व फिक्सिंग करणारे), वेल्डर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, आणि अकुशल कामगार (श्रमिक) या पदांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर या वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी. तसेच ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment-Job Seeker (Find a Job)-Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर नोंदणी करताना भरलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login मध्ये Registration Id (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड भरुन Login वर क्लिक करावे. त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील Mumbai Sub Urban जिल्हा निवडून त्यातील Action-view details या ऑप्शनमध्ये मध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व vacancy listing मध्ये रिक्त पदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे, त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ.माहिती प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता आपणाशी संपर्क साधणे शक्य होते, तसेच पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी काही समस्या येत असल्यास या कार्यालयाच्या 02141-222029 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त शा. गि. पवार यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close