Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

लॉकडाउन आणि अर्थव्यवस्था

mh20live Network

२५ मार्च २०२० पासून देशात लॉकडाउन जाहीर झालं आणि अत्यावश्यक वस्तू आणि सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय ठप्प झाले. लॉकडाउन जरी २५ मार्चपासून जाहीर झालं असलं तरी याच्या झळा आधीपासूनच बसायला सुरवात झाली होती. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूच्या साथीने भारतात हि तांडव सुरुच ठेवलं आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सलग तीन वेळेस लॉकडाउन केलं तरी देखील खात्री नाही कि तिसरे लॉकडाउन संपल्यावर सर्व काही सुरळीत होईल. याचा फार मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसत आहे. ह्या लॉकडाउन मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि विविध घटकांवर फार दूरगामी परिणाम होतील यात शंका नाही. या परिणामांचीच चर्चा आज आपण करणार आहोत.सर्वप्रथम बळीराजा जो सगळ्या जगाचा पोशिंदा आहे. कधी दुष्काळानं तर कधी अतिवृष्टीनं पछाडलेल्या बळीराजाला ह्या वर्षी कोरोनाननं ग्रासलं. विशेष करून त्यांना ज्यांनी नाशवंत वस्तूंची लागवड केली होती. कित्येक शेतकऱ्यांनी मिळेल त्या मार्गाने भांडवल उभं करून पालेभाज्या, फळ-फुलबागांची लागवड केली होती. परंतु ह्या लॉकडाउनमुळं त्यांच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरलं आहे. एक तर ह्या वस्तुसाठी ग्राहक मिळत नाहीयेत आणि जे मिळत आहेत ते योग्य दर देत नाहीयेत. अशा स्तिथीत मागेल त्या दराने शेतमालाची विक्री करावी लागत आहे कारण विकलं नाही तर सगळ्याच मालाची नासाडी होईल आणि या सर्व मिळकतीतून त्यात गुंतवलेला पैसा देखील काढणं मुश्किल झालंय.जशी अवस्था बळीराजाची आहे त्यापेक्षाही बिकट अवस्था मजुर आणि कामगारांची आहे विशेष करून त्यांची ज्यांचं हातावर पोट आहे. कारण यांच्याकडं उदरनिर्वाह करण्यासाठी रोजच्या मजुरी शिवाय दुसरं  साधन नाही. पोट भरणं अवघड होत असल्यामुळंच लाखो मजुर आपापल्या गावी परतण्यासाठी धडपड करत आहेत जेणेकरून तिथं तरी पोटभर जेवण करून जगता येईल. लॉकडाउन असल्यामुळं सगळी वाहतूक बंद आहे आणि त्यामुळे हे मजुर शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत आहेत. शुक्रवारची करमाड जी. औरंगाबाद येथील दुर्दैवी घटना हि याचाच भाग होती. गावी परतताना रेल्वे रुळावर झोपलेले परप्रांतीय मजुर मालगाडी खाली चिरडल्याने जागीच मृत्युमुखी पडले. इतकं भीषण होत चाललंय यांचं जगणं त्यामुळं जो पर्यंत उद्योग धंदे सुरु होत नाहीत यांच्या पोटाची खळगी भरणं अवघड आहे.लघु आणि मध्यम उद्योजकांची स्तिथी देखील काही वेगळी नाहीये. कारण अर्थव्यवस्थेचा मजबूत स्तंभ मानल्या जाणारे लघु आणि मध्यम उद्योग ठप्प झालेत. आधीच मंदीमुळे परेशानी होती आणि त्यात कोरोना येऊन बसला. दुष्काळात तेरावा महिना असंच झालंय यांचं. कारण व्यवसाय तर ठप्प आहेत परंतु सगळे खर्च तर सुरूच आहेत जसं कि घर आणि व्यवसायाचं भाडं, टॅक्सचं देणं, कामगारांच्या काही प्रमाणात पगारी, कर्जाचे हफ्ते आणि इतर खर्च. त्यातल्या त्यात हंगामी व्यवसायाचं तर जास्तच अवघड आहे कारण एकदा हा हंगाम गेला तर परत एका वर्षाची वाट पाहावी लागल आणि वर्षभर गणित जुळवणं तारेवरची कसरत असल. सर्वच व्यावसायिक चिंतेत आहेत कारण व्यवसाय कधी सुरु होतील याची खात्री नाही आणि सुरु झाले तरी पटरी रुळावर यायला किती दिवस लागतील यात शंकाच आहे.नोकरदार वर्ग तर आर्थिक संकटाच्या चक्रव्यूहात अडकला आहे. ह्या लॉकडाउनमुळं कितीतरी लोकांच्या नौकऱ्या गेल्या आणि ज्यांच्या राहिल्यात त्यांच्या पूर्ण पगारी देखील झाल्या नाहीत. पगारीच्या भरवश्यावर जे लोकांचं देणं केलंय ते, घरभाडं, कर्जाचा हफ्ता, घरखर्च, इत्यादी फेडणं अवघड झालंय. कंपन्या सुरु झाल्या तरी नौकरी राहील का नाही आणि पगार देखील एवढाच राहील का नाही याची काहीच शाश्वती नाही. त्यातल्या त्यात यावर्षी सरकारी आणि प्रायव्हेट नोकरभरती होण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे येणाऱ्या काळात बेरोजगारांची संख्या वाढण्याची भीती आहे.या सोबतच मोठे उद्योगावर देखील हे संकट कायम आहे. मग ते कोणतेही क्षेत्र असो जसे कि ऑटोमोबाइल्स, टेक्सटाईल, हॉटेल इंडस्ट्री, शैक्षणिक क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक, आयटी इंडस्ट्री, रियल इस्टेट इत्यादी. सर्व मोठ्या उद्योगावर देखील आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळं सध्या तरी ह्या सर्व संकातून बाहेर पडण्यासाठी कोरोनावर विजय मिळवणं आवश्यक झालंय.ही तर आपण सध्याची स्तिथी पहिली परंतु या संकटा विरुद्ध लढण्याचा आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्यालाच शोधावा लागेल. या महिन्यात कोरोनाचा प्रभाव बघुन कदाचीत टप्या-टप्याने व्यवसाय सुरु होतील. कारण सरकार देखील एका वेळेपर्यंतच लॉकडाउन ठेवेल आणि हळूहळू ते नियम शिथिल करतील. सरकारचं काम आहे आपल्याला कोरोना रोगाची जाणीव करुन देणं ते त्यानी केले आहे. रोगापासून बचाव कसा करायचा हे देखील सांगितलं. आता हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण याला कसं हाताळायचं. देशातील कोरोना रुग्णांची स्तिथी तर आपण बघतच आहोत कशी झपाट्याने वाढत आहे. आता आपलं स्वतःचं आणि परिवाराचं आरोग्य आपल्याच हातात आहे. सरकार आपल्यावर चोवीस तास पाळत ठेऊ शकत नाही त्यामूळे व्यवसाय सुरु झाल्यावर नियमांचे पालन करणं फार महत्वाचं आहे. मास्कचा वापर, सनिटयजार, हैण्ड वॉश इ. चा वारंवार वापर गरजेचं आहे. या सर्व गोष्टिंचा विचार करुनच घराबाहेर कामासाठी पडायचं.लॉकडाउन मुळे आधिच संथपणे चालणारी अर्थव्यवस्थेची चाके बंद पडली आहेत. याचं फिरणं फार महत्त्वाचं आहे. कारण ही जर फिरली नाहीत तर गरिबी, बेरोजगारी अन उपासमारीचं मोठं संकट समोर असंल.  परंतु आपण आपल्या रितीने याला कसं हाताळु शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे आपल्या पासून सुरु झालं पाहिजे. इतक्या दिवसा पासून व्यवसाय बंद असल्यामूळे सगळ्यानाच पैशाची चणचण भासत आहे परंतु जसे ही व्यवसाय सुरु होतील आपण प्राथमिकते नुसार लोकांचे देणे फेडणे गरजेचे आहे. काही जण पैसे असुन देखील कोरोनाचं कारण पुढं करुन पैसे देणं टाळतील पण असं केल्याने मार्केट मधे पैसा येणं थांबल आणि अडचण जास्त वाढेल. मला जर पैसा वेळेवर मिळाला तर माझी जिम्मेदारी देखील आहे की तो पुढे ही वेळेवरच गेला पाहिजे.सरकारला विनंती आहे की त्यानी योजना आखताना सर्व घटकांचा विचार केला जावा आणि ज्या योजना आखल्या आहेत त्याची योग्य रितीने अंमलबजावणी व्हावी जेणेकरुन गरजू पर्यंत मदत पोहचंल. यात प्रशासनाने स्थानिकांच्या अडचणींना प्राधान्य देऊन त्याला सोडवण्याचा प्रयत्न करावा. असं करत राहिलं तरच हळूहळू यातून बाहेर पडता येईल.ह्या सगळ्यामधे लहान व्यवसायाचं खुप नुकसान झालंय आणि आता त्याना उभारी देन महत्वाचं आहे. बँकाना आणि वित्तीय संस्थांना विनंती आहे की त्यानी व्यवसायांना कमी व्याजदराने पैसा उपलब्ध करुन द्यावा. आज खऱ्या अर्थाने गरज आहे तुमची गरज आहे देशाला. या अडचणीच्या काळात तुम्हीच उद्योग धंद्याला नवजीवन देऊ शकतात. हेच व्यवसाय येणाऱ्या काळात तुमच्या यशाचे भागीदार असतील. जर तुम्ही कमी दरात पैसे उपलब्ध करून नाही दिला तर व्यावसायिकांना नाईलाजाने बाहेरुन जास्त दराने पैसे घ्यावे लागतील आणि या काळात ते फेडण जास्त अवघड जाईल. व्यवसायीकांनी देखील नोकरदार आणि मजुरांना कामावरून न काढता त्यांना कामाचा योग्य मोबदला दिला पाहिजे जेणेकरून या अवघड काळात त्यांचं संवर्धनही शक्य होईल. अजुन खुप समस्या आहेत  कारण हा लॉकडाउन जरी दिड दोन महिन्याचा असला तरी याचे परिणाम फार दुरवर राहतील यात शंका नाही तरी पण आपण सर्व एकीने लढून त्यावर विजय मिळवत जाऊया.. घरी रहा, सुरक्षित रहा..
सीएमए अनंत जे. दर्गड/ सीए प्रवीना ए दरगड

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close