Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पर्यावरणपूरक बांधकामासाठी स्थानिक साहित्याचा वापर होणे गरजेचे :माहिती संचालक गणेश रामदासी

औरंगाबाद,दि. 29 : नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करुन करण्यात आलेले घराचे बांधकाम हे पर्यावरणपुरक असल्याने पर्यावरणाची हानी होण्यास प्रतिबंध करता येतो त्यामुळे भविष्यातही या संकल्पनेकडे अधिक व्यापक दृष्टीकोनातून पाहणे काळाची गरज असल्याचे मत संचालक (माहिती) गणेश रामदासी यांनी आज येथे मांडले.
हेही वाचा जय श्रीराम! राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार

दौलताबाद परिसरातील हिरण्य रेसॉर्ट येथे ‘अरण्यार्थ फाऊंडेशन’ बंगलूरू यांनी आयोजित केलेल्या नैसर्गिक बांधकाम आणि पुनर्जन्म आर्किटेक्चरल कार्यशाळेचे उद्घाटन श्री.रामदासी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अरण्यार्थ फाऊंडेशन बंगलूरूच्या संस्थापिका अन्विता कासार, सदस्य सप्तमी मोरे, राधिका जाधव तसेच औरंगाबाद, हैद्राबाद आणि मुंबई येथून आलेल्या आर्किटेक्ट शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती.
हेही वाचा सिल्लोड तालुक्यातील 102 ग्रामपंचायत चे आरक्षण जाहीर ..कही खुशी कही गम

पुढे बोलतांना श्री.रामदासी म्हणाले की, खरंतर घर बांधणे हे कौशल्याचे काम आहे. त्यातही नैसर्गिक व स्थानिक साहित्यांचा वापर करुन घर बांधणे ही कला आता हळूहळू विलप्त होत आहे. आर्किटेक्ट विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ही संकल्पना रुजवावी. या संकल्पनेतील अधिकाधिक बारकाव्यांचा अभ्यास भविष्यात विद्यार्थ्यांनी करावा. नैसर्गिक साहित्याच्या बांधकामात वाळू, दगड, माती, लाकूड, विविध खडक, कुजलेले विविध प्रकारचे दगड याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे सिंमेट, सळई, वा इतर कृत्रिम साहित्याचा वापर टाळता येऊ शकतो. अशा बांधकामाचे दाखले आपल्याला पुरातन काळातून घेता येऊ शकतात.
ही कार्यशाळा 29 ते 31 जानेवारी 2021 या दरम्यान होणार असून शेवटच्या दिवशी वेरुळ येथे अभ्यास दौरादेखील आयोजित करण्यात आला असल्याचे फाऊंडेशनच्या अन्विता कासार यांनी सांगितले
हेही वाचा घटनात्मक आयोगास बोगस म्हणणारे मंत्री वडेट्टीवार राजीनामा द्या!मराठा क्रांती मोर्चाची मा

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close