Subscribe to our Newsletter
Loading
यशकथाशेतीविषयक

लंडनमधली १० लाखांची नोकरी सोडून ‘हे’ जोडपं गावी करतयं शेती; यूट्यूबवरही झालयं फेमस..!वाचा सविस्तार

https://www.instagram.com/p/CEb6O06nu-T/


माणसाचे माणुस पण काय आसते ,आपण काय करतो ,सर्व काही पैसा आहे न करता आपले माणस ती माणस आसतात ,आपल्या भारत देशात आजही भारतीय लोक गुण गोविंदाने राहतात ,तसे बाहेरील देशात नाही ,आसे या फँमलीला वाटले ,आपले आई वडील हे एकटेच घरी राहतात, ते शेती कामगारकडून करूण घेतात आपण जर ,नविन तत्रज्ञाने शेती केली तर फायदा होईल .आई वडील ,मुल याचा आनंद वेगळा आसेल आसे यांना वाटले ..

https://www.instagram.com/p/CGZ9X7-n_Bf/

चांगली नोकरी करून कुटूंबाचे पालनपोषण करणे हे अनेकांचे किंबहुना प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु काहीजण यालाही अपवाद आहेत. चांगली नोकरी सोडून त्यांना खेडेगावात रमायला आणि शेती करायला आवडते. गुजरातमधील बारन गावातील एका जोडप्याने असाच प्रवास केला असून परदेशातील नोकरी सोडून त्यांनी गावी शेती करण्यास सुरवात केलीय. आज त्यांना शेतीतून चांगली कमाई देखील होतेय. परंतु त्यांचा हा उलटा प्रवास जितका प्रेरणादायी तितकाच संघर्षमय देखील असल्याचे पहायला मिळते. चला तर जाणून घेऊया फॉरेन रिटर्न या शेतकरी दांपत्याविषयी…

पोरबंदर, गुजरातमधील बारन गावचा रामदे खुटी हा तरूण, पत्नी भारती खुटी यांच्यासोबत लंडनमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक झाला होता. दोघांनाही लाखोच्या घरात पगार मिळत होता. परंतु एके दिवशी या दोघांनी गावी जाऊन तिकडेच शेती करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा हा निर्णय धक्कादायक असला तरी तो भारतीय तरूणाईसाठी किती प्रेरणादायी आहे हे पुढे वाचल्यानंतर समजून येईल…

रामदे खुटी २००६ साली प्रथम इंग्लंडला गेले. तिथे त्यांना चांगली नोकरी देखील मिळाली. नोकरीच्या दरम्यान २००८ मध्ये त्याने भारती यांच्याशी लग्न केले. त्यावेळी भारती राजकोटमध्ये विमानतळ व्यवस्थापन आणि एअर होस्टेसचा अभ्यास करत होत्या. २०१० मध्ये शिक्षण संपल्यानंतर त्या लंडनला पती रामसोबत राहण्यासाठी गेल्या. तेथे त्यांनी आंतरराष्ट्रीय पर्यटन व आतिथ्य व्यवस्थापन विषयात पदवी संपादन केली. या पदवीनंतर त्यांनी ब्रिटिश एअरवेजच्या हीथ्रो विमानतळावरुन आरोग्य आणि सुरक्षिततेचा कोर्स केला आणि त्यानंतर तेथेच काम करण्यास सुरवात केली.

लंडनमध्ये चांगली नोकरी आणि लक्झरी आयुष्य जगणाऱ्या या दांपत्याने गावी परतून शेती करण्याचा का निर्णय घेतला हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र याचे खरे कारण भारतीय संस्कृती आणि एकत्र कुटूंबपध्दतीच्या संस्कारात दडलेले आहे. वास्तविक, इंग्लंडमध्ये वास्तव्य करताना रामदे यांना आपल्या आई वडिलांची काळजी कोण घेईल याबाबत चिंता वाटत होती. तसेच त्यांची शेती देखील मजुरांच्या कडून करून घेतली जात होती. आई वडिलांची सेवा करण्याच्या आणि शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने अखेर रामदे आणि भारती यांनी एकमेकांच्या संमतीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

https://www.instagram.com/p/CD_wRNlp47A/?utm_source=ig_web_copy_link

भारतात परतल्यानंतर या दांपत्याला सुरवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारण शेतीत प्रत्यक्ष राबणे आणि शेती करण्याचा निर्णय घेणे यात खूप फरक होता. तसेच दोघांनीही शेतीत फारसे कधीच कामही केले नव्हते. तरी येणाऱ्या अडचणीतून शिकत रामदे आणि भारतीने नव्याने शेती व पशुपालन करण्याचे काम सुरू केले. पारंपारिक शेती सोडून आधुनिक पद्धतींचा अवलंब केला. कालांतराने दोघेही शेतीत चांगलेच गुंतल्याचे दिसून येते. दूध काढण्यापासून सर्व कामे भारती स्वतः करतात.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close