Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

जाणून घ्या कांद्याच्या पातीचे आश्चर्यकारक फायदे…!


कांद्याची पात आपण नेहमीच खातो. विशेषतः चायनीज खाण्यामध्ये याचा जास्त उपयोग करण्यात आलेला आपल्याला दिसतो. पण कांद्याच्या पातीची तुम्ही भाजीही नेहमी करून खाऊ शकता. यामध्ये अनेक पोषक तत्व असतात.

                                       (संग्रहित फोटो)      

लाईफस्टाईल : काद्यांची पात आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मुळात हिरव्या भाज्याच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. कांद्याची पात खायला चवदार आहेत शिवाय तिच्यात अनेक पौष्टिक तत्वे देखील आहेत. जी तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

कांद्याच्या पातीमध्ये कार्बोहाइड्रेट्स, विटामिन सी, प्रोटीन, फॉस्फोरस, सल्फर आणि कॅल्शियम असते. त्याचप्रमाणे यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे काद्यांची पात खाल्लाने तोंडाची दुर्गंधी दूर होते. काद्यांची पात खाल्लांने तुमची दृष्टी वाढते आणि मोतीबिंदूची लक्षणे कमी होतात.


कांद्याची पात खाण्याचे फायदे : कांद्याची पात खाल्लाने तुमच्या तोंडातून येणारा वास कमी होतो. शिवाय बद्धकोष्ठता देखील दूर होते आणि अ‍ॅसिडिटीची समस्या कमी होते. जर आपल्या पोटात जळजळ होत असेल तर कांद्याची पात खाल्लाने आराम देखील मिळतो. हे हृदयरोगामध्येही खूप उपयुक्त आहे.

सर्व प्रकारच्या हंगामी रोगांमध्ये आपल्याला या भाजीचा फायदा होतो. कांद्याची पात आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करते. रक्तातील साखरेची पातळी कमी करते. मोठ्या आंतड्याच्या कर्करोगापासून मुक्त होण्याशिवाय कांद्याची पात उपयुक्त आहे.


रक्तातील साखरेची पातळी कमी करते : कांद्याची पातमध्ये ओनियन्स सल्फर असल्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. सल्फर संयुगे शरीरात इन्सुलिन तयार करण्याची क्षमता वाढवतात. आपल्या मधुमेह रोखण्यासाठी हे बर्याच प्रमाणात प्रभावी आहे.


पचन सुधारते : कांद्याची पातीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचन सुधारण्यास मदत करते.

कोलेस्ट्रॉलसाठी फायदेशीर : हिवाळ्यात ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉलची समस्या असते, त्यांच्यासाठी हिरव्या पातीचा कांदा उपयोगी ठरतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी कांद्याची पात तुम्ही तुमच्या जेवणामध्ये समाविष्ट करून घ्या.


डोळ्यांसाठी उत्कृष्ट : हिरव्या कांद्याच्या पातीमध्ये कॅरोटीनॉईड असते, जे तुमच्या डोळ्यांची दृष्टी अधिक चांगली करण्यासाठी उपयुक्त ठरते. कांद्याच्या पातीमध्ये विटामिन ए चे प्रमाण असते. हे गाजर अथवा काकडीसह खाल्ल्यास याचा अधिक फायदा तुमच्या डोळ्यांना आणि शरीराला मिळतो.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close