Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

स्माइल ट्रेन इंडियाच्या सहयोगाने जागतिक हास्यदिनाचे औचित्य साधून सुरू केले “एक नयी मुस्कान” अभियान

स्माइल ट्रेन इंडियाच्या सहयोगाने जागतिक हास्यदिनाचे औचित्य साधून सुरू केले “एक नयी मुस्कान” अभियान
औरंगाबाद –  जागतिक हास्यदिनाचे औचित्य साधून भारतातील आघाडीची वेलनेस कंपनी असलेल्या हिमालया ड्रग कंपनीने आपला फ्लॅगशिप सामाजिक प्रभाव उपक्रम मुस्कान मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये सुरू केला आहे। ओठ आणि टाळूशी संबंधित व्यंगांबाबत (क्लेफ्ट) जागरूकता निर्माण करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे। स्माइल ट्रेन या जगातील आघाडीच्या क्लेफ्ट संस्थेच्या सहयोगातून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम गरजू मुलांना प्राणरक्षक क्लेफ्ट उपचार मोफत पुरवण्यास मदत करेल।
“एक नयी मुस्कान” या अभियानाच्या माध्यमातून हिमालया लिप केअर फाटक्या (क्लेफ्ट) ओठ व टाळूवरील उपचारांबाबत अगदी तळागाळापर्यंत जागरूकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करेल।  आठ वर्षांच्या मुनमुनची प्रेरणादायी कथा सांगणा-या हृदयस्पर्शी व्हिडिओसह या अभियानाची सुरुवात करण्यात आली। सुरक्षित क्लेफ्ट सर्जरीद्वारे मुनमुनचे आयुष्य कसे बदलले याचे चित्रण ही फिल्म करते।
“एक नयी मुस्कान आमच्या हृदयाच्या जवळचे अभियान आहे आणि स्वास्थ्याच्या माध्यमातून आनंदाचा प्रसार करण्या-या आमच्या ब्रॅण्डचे चैतन्य यात ख-या अर्थाने सामावलेले आहे असे आम्हाला वाटते। आम्ही हिमालयाच्या माध्यमातून ख-या अर्थाने लोकांची आयुष्ये बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतो। आमची या उद्दिष्टाप्रती असलेली बांधिलकी कायम ठेवत आम्ही सध्याच्या नवीन परिस्थितीत आलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचाही यात समावेश केला आहे। स्माइल ट्रेन इंडियाशी झालेल्या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही गेली पाच वर्षे लहान मुलांच्या क्लेफ्ट सर्जरीज मोफत करण्यात मदत करून भारतभरातील अनेक कुटुंबांच्या चेह-यावरील हास्य परत आणत आहोत। फाटक्या ओठासह आयुष्य कंठणा-या मुलांची आयुष्ये बदलून टाकण्याचा व त्यांना स्वप्ने साध्य करण्यात मदत करण्याचा आमचा प्रयत्न असाच सुरू राहील,” असे हिमालया ड्रग कंपनीच्या ग्राहक उत्पादन विभागाचे व्यवसाय संचालक श्री। राजेश कृष्णमूर्ती म्हणाले।
या उपक्रमाचा एक भाग म्हणून मध्यप्रदेश व छत्तीसगढमधील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मल्टिमीडिया जागरूकता अभियान सुरू करण्यात आले आहे। क्लेफ्टबद्दल तसेच मोफत क्लेफ्ट उपचारांबद्दल माहिती घेण्यासाठी स्माइल ट्रेन इंडियाची टोल फ्री क्लेफ्ट हेल्पलाइन, १८००-१०३-८३०१ उपलब्ध आहे।
स्माइल ट्रेनच्या आशिया प्रादेशिक संचालक श्रीमती ममता कॅरोल क्लेफ्टबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या तसेच लवकर वैद्यकीय उपचार प्राप्त करण्याच्या महत्त्वावर भर देत म्हणाल्या, “भारतात दरवर्षी ३५,०००हून अधिक बाळे फाटक्या ओठासह जन्माला येतात। त्यामुळे त्यांच्या वाढीच्या क्षमतेवर मोठा परिणाम होतो। उपचार न मिळालेल्या क्लेफ्टमुळे खाण्यात, श्वसनात, ऐकण्यात तसेच बोलण्यात अडचणी येतात। क्लेफ्टवर अत्यंत सुरक्षित शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपचार करता येतात याबाबत जागरूकतेचा अभाव आहे। आमच्या मध्यप्रदेश व छत्तीसगढमधील सहयोगी रुग्णालयांमध्ये आता, रुग्ण व आरोग्यसेवक दोहोंची काळजी घेण्याच्या उद्दिष्टाने सुरक्षितता नियम अधिक काटेकोर करून, हळुहळू क्लेफ्ट शस्त्रक्रिया पुन्हा सुरू होत आहेत आणि क्लेफ्ट रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यात आम्ही मदत करत आहोत। हिमालया ड्रग कंपनीसोबत झालेल्या सहयोगाचा आम्हाला अभिमान आहे। गेल्या पाच वर्षांत कंपनीने क्लेफ्टसह जगणा-या अनेक मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवले आहे।” 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close