Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

टैफे द्वारे कृषी आणि वाहतुकसाठी सर्वोत योग्य क्रांतिकारी डायनाट्रॅक सिरीजचा लॉन्च

टैफे द्वारे कृषी आणि वाहतुकसाठी सर्वोत योग्य क्रांतिकारी डायनाट्रॅक सिरीजचा लॉन्च

मुंबई : जगातील तिसरी सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी,  टैफे  ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड, मॅसी फर्गुसन ट्रॅक्टर्सची निर्माता असून त्यांनी आपली नवी डायनाट्रॅक सिरीज आरंभ केली आहे – ट्रॅक्टर्सची ही एक प्रगत रेंज असून ती देते दणकट परफॉर्मन्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान, अतुलनीय उपयुक्तता आणि वैविध्यता, आणि हे सर्वकाही एकाच शक्तिशाली ट्रॅक्टरमध्ये सामावलेले आहे.  

टैफे  चे गेल्या 60 वर्षांमधील सिध्दहस्त इंजिनियरींग कौशल्य, भारतीय शेतीबाबत त्यांचे सखोल ज्ञान आणि समज, यांच्यामुळे कृषी तसेच हॉलेज दोन्हींसाठी ट्रॅक्टर्सची एक अजोड प्रीमियम रेंज निर्माण करण्यात मदत झाली आहे.

ही नवीन डायनाट्रॅक सिरीज उत्तम मायलेज, टिकाऊपणा आणि आरामाची खात्री करण्यासोबतच अधिकाधिक उत्पादकता देण्यासाठी डिझाईन केलेली आहे. डायनाट्रॅकची  डायनालिफ्ट®  हायड्रॉलिक्स सिस्टीम सर्वोत्कृष्ट लिफ्ट क्षमता, उत्पादकता आणि स्पीडद्वारे या ट्रॅक्टरला सेगमेंटमधील सर्वोच्च स्थान देते, जे आजीवन टिकून राहते.

वर्साटेक™ तंत्रज्ञानाने युक्त जगातील पहिला ट्रॅक्टर, डायनाट्रॅक देतो एक विस्तारयोग्य व्हीलबेस, त्यामुळे तो संपूर्ण वर्षभर वापरासाठी कृषी, हॉलेज आणि वाणिज्यिक वापरांसाठी आदर्शरित्या सुयोग्य बनवतो. हा ट्रॅक्टर अधिकतम ग्राऊंड क्लिअरन्स देतो, त्यामुळे तो पडलिंगसह सर्व-प्रदेशातील कार्यांसाठी श्रेणीतील सर्वोत्तम आहे आणि बांध सहजपणे ओलांडतो. याचा अधिक लांब व्हीलबेस आणि स्टायलिश हेवी-ड्युटी फ्रंट बंपर ट्रॅक्टरच्या एकंदर लुकमध्ये भर घालतात आणि देतात अधिक स्थिरता, त्याचवेळी लोडर्स आणि डोझऱ्ससारखी हेवी-ड्युटी उपकरणे सहजपणे हाताळतो.

हा ‘सर्वात मोठा ऑल राऊंडर ट्रॅक्टर’ (सबसे बडा ऑल राऊंडरसिंपसन इंजिनच्या शक्तिवर चालतो, जे शक्तिशाली आणि इंधन-कार्यक्षम इंजिन्ससाठी सर्वोत्कृष्टतेचा मानदंड आहेत.  डायनाट्रांस™   ट्रान्समिशनसोबत, ड्युअल डायफ्राम क्लच, 24 स्पीड  कॉम्फिमेश®  गिअरबॉक्स सोबत  सुपर शटल तंत्रज्ञान आहे यामुळे ऑपरेटरला उत्तम आराम मिळतो, सर्वोत्कृष्ट सुंदरता मिळते आणि चालू अवस्थेत प्रत्येक वापरासाठी योग्य स्पीड निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते.

डायनाट्रॅक सिरीजचे सर्वोत्कृष्ट आणि अतिशय लोकप्रिय 4-इन-1  क्वाड्रा पी.टी.ओ.™  सर्वात स्थिर आणि डायनॅमिक अँप्लिकेशन्स संपूर्ण वर्षभरासाठी ट्रॅक्टरची वैविध्यता देतो, त्यामुळे तो अधिक नफेशीर बनतो.

डायनाट्रैक  सिरीजचा आरंभ करताना, मल्लिका श्रीनिवासन,  सी.एम.डी. – टैफे  , म्हणतात,   टैफे   च्या डायनाट्रॅक सिरीजने उपयुक्तता आणि विविधता, आराम आणि सुरक्षितता, उत्पादकता आणि कार्यक्षमता यामध्ये नवे मानदंड स्थापित केले आहेत, त्यामुळे आधुनिक शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांच्या सतत बदलत्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण होतात, त्यांना सर्वोत्तम तंत्रज्ञानाचे बळ मिळते आणि यांच्या फायद्यामुळे त्यांचे जीवन आणि उपजीविका समृध्द होतात.”

डायनाट्रॅक सिरीजचा आरंभ केल्याने, टैफे ने आपल्या श्रेणीतील मानदंडांची व्याख्या बदलली आहे, भारतीय इंजिनियरींगमधील आपली ताकद सर्वोत्तमरित्या प्रदर्शित केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close