Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेसलाईफ स्टाईल

 गुगल असिस्टंटवर एआय पॉवर्ड व्हॉइस चॅटबॉट लाँच

 
ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

मुंबई- आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने ‘गुगल असिस्टंट’वर आपल्या ग्राहकांसाठी ग्राहक सेवा चॅटबॉट सुरू केले आहे. यामुळे कंपनीच्या विमाधारकांना ‘ओके गुगल, आय वाँट टु स्पीक टु आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ लिगो’ किंवा ‘मे आय टॉक टु आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ लिगो’ अशा सोप्या व्हॉइस कमांड्सद्वारे (आवाजी आदेश) आपल्या शंकांचे निरसन करून घेता येणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या (एआय) डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आणखी नाविन्यपूर्ण व सोयीस्कर सुविधा लाँच केली आहे. गुगल असिस्टंटवर लिगो सेवेचा विस्तार करणे हा ग्राहकांच्या पसंतीच्या प्लॅटफॉर्मवर कार्यरत असण्याच्या आणि त्यांना उपयुक्त अनुभव देण्याच्या कंपनीच्या धोरणाचा एक भाग आहे.

ग्राहकांना त्यांच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर ‘गुगल असिस्टंट’ सक्रिय करून व आपल्या विमा योजनेचा क्रमांक तसेच नोंदणीकृत मोबाइलचा क्रमांक देऊन त्यांच्या विमा योजनेविषयी माहिती घेता येईल. हे गुगलला ट्रॅफिकच्या दिशांविषयी विचारण्याइतके सोपे आहे.

वेगाने बदलणारे, वेग, कार्यक्षमता व सोयीस्करपणा यांना प्रचंड महत्त्व असणारे डिजिटल जग सातत्याने सुधारत असून त्यात एआय- पॉवर्ड व्हॉइस असिस्टंट्सचा वेगाने स्वीकार केला जात आहे, कारण त्यावर वैयक्तिक आणि तत्काळ अनुभव दिले जातात. ‘भारतीय इंग्लिश’मध्ये उपलब्ध असलेले आणि नऊ भारतीय भाषांत उपलब्ध असलेले गुगल असिस्टंट लोकांना गुगलबरोबर संवाद साधणे व त्यांच्या आयुष्यात नैसर्गिक व वैयक्तिक मार्गाने कामे पूर्ण करण्यास मदत करते.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एन. एस. कन्नन म्हणाले, ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफमध्ये आमचे सर्व नाविन्यपूर्ण संशोधन ग्राहककेंद्री असते. काही काळापूर्वी आम्ही व्हिडिओ, व्हॉइस आणि व्हर्नाक्युलर या तीन ‘व्ही’वर आधारित अतीसूक्ष्म- वैयक्तीकरणाचा प्रवास सुरू केला होता. ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही ‘गुगल असिस्टंट’वर आमचे ग्राहक सेवा व्हॉइस बॉट लिगो लाँच सुरू केले असून, त्यामुळे ते सर्व प्लॅटफॉर्म व उपकरणांवर उपलब्ध आहे. व्हॉइस कमांड्सच्या मदतीने विमा योजनेची माहिती मिळवणे अतिशय सोयीस्कर आहे. डिजिटल अनेबलरही समाविष्ट केल्यामुळे ग्राहकांच्या कंपनीशई संवाद साधण्याच्या स्वरुपात आमूलाग्र बदल होईल. ग्राहकांना सक्षम करण्यासाठी आम्ही अशआच प्रकारे नाविन्यपूर्ण सुविधा देत राहू. ’

नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कंपनीने विमा योजनेच्या जीवनचक्दारम्यान ग्राहकाच्या खरेदीपासून देखभालीपर्यंतच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी विविध डिजिटल अनेबलर्स लाँच केले आहेत. उदा. ग्राहकांना कंपनीचे डिजिटल अनेबलर्स वापरून ऑनालाइन व्यवहार करता येतील आणि प्रत्येक डिजिटल अनेबलर म्हणजेच व्हॉट्सअप, कंपनीचे संकेतस्थळ, मोबाइल अप आणि चॅटबॉट लिगो इत्यादी एखाद्या व्हर्च्युअल शाखेइतकेच सुसज्ज आहेत. चॅटबॉट लिगोवर दर महिन्याला 3.5 लाख व्हॉइस चॅट्स होतात. ग्राहकांना या डिजिटल अनेबलर्सचा वापर करून विविध प्रकारचे व्यवहार करता येतात.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close