एलजीने मुंबई-ठाणे विभागात सुरू केले त्यांचे ३९ वे ब्रँड शॉप, आपल्या ग्राहकांसाठी सादर केला अभिनव ब्रँड अनुभव
मुंबई : भारतातील गृहोपयोगी वस्तूंच्या उद्योगक्षेत्रात रिटेलिंगची मानके नव्या स्वरुपात सादर करण्याच्या निर्धाराने एलजी इलेक्ट्रॉनिक्सने घाटकोपर येथे त्यांचे ३९ वे ब्रँड शॉप सुरू केले. इलेक्ट्रॉनिक्स रिटेल क्षेत्रात आघाडीवर असलेल्या श्री. शांतिलाल हरधोर कारिया यांच्या नेतृत्वाखालील एस्टिलो या भागीदारासोबत त्यांनी हे शॉप सुरू केले. देशातील रिटेल क्षेत्रातील आव्हानात्मक मागणीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आलेल्या एम.जी रोडवरील एलजी बेस्ट शॉप मे. एस्टिलो या दुकानाचे उद्घाटन पश्चिम विभागाचे सेल्स हेड श्री. सुरिंदर सचदेवा, एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा. लि.चे रिजनल बिझनेस हेड श्री. अरिफ परमार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी गायिका व परफॉर्मर पल्लवी इशपुनियानीसुद्धा उपस्थित होती. तिने बॉलीवूडमधील काही लोकप्रिय गाणी या वेळी गायली.
सातत्याने वाढणाऱ्या रिटेल बाजारपेठेला काबीज करण्यासाठी वाटचाल करणाऱ्या आणि लाइफस्टाइल रिटेलिंगची मानके नव्या स्वरुपात करण्यासाठी एलजी देशभर एक्सक्लुझिव्ह प्रीमिअम शोरूम सुरू करत आहे. विविध शहरांमध्ये एलजी बेस्ट शॉप अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी योजना आखली आहे आणि तिची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या उद्घाटनप्रसंगी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या पश्चिम विभागाचे सेल्स हेड श्री. सुरिंदर सचदेवा म्हणाले, “सगळ्या दुकानांमध्ये उठून दिसणारे, त्याचप्रमाणे एलजी ब्रँडची मूल्ये दर्शविणारे दुकान घडविणे हा आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. आमच्या ग्राहकांसाठी कायम उपलब्ध असणे हे आमचे रिटेल धोरण राहिले आहे आणि हेच लक्षात ठेवून ग्राहकांच्या अभिनवता, दर्जा व उत्कृष्टतेच्या प्रतिमांशी जुळणारा सर्वोत्तम रिटेलिंग अनुभव देण्याच्या दृष्टीने आमचे हे ब्रँड शॉप डिझाइन केले आहे. एलजी ब्रँडमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या विश्वासाला महत्त्व देतो; आमच्याकडून आमच्या ग्राहकांना असलेल्या अपेक्षांची आम्हाला जाणीव आहे. नवीन उत्पादने व नव्या जागतिक दर्जाच्या एलजी ब्रँड शॉपसह ग्राहकांना जागतिक दर्जाचा खरेदीचा अनुभव प्राप्त होईल.”
एलजी बेस्ट शॉप सामान्य एक्सक्लुझिव्ह स्टोअरच्या पलिकडला अनुभव देते. तेथे अधिक परस्परसंवादी वातावरण आहे आणि डिस्प्लेमध्ये लाइफस्टाइल ओरिएंटेशन सादर केले आहे. एलजी आयडेंटिटीची ओळख करून देण्याच्या उद्दिष्टाने एलजी बेस्ट शॉप कन्सेप्ट स्थापन करण्यात आली. अनियोजित खरेदी करणाऱ्या ग्राहकाला आकर्षित करणे हा या शॉपचा हेतू आहेच, त्याचप्रमाणे एलजी उत्पादनांची ओळख करून देताना परस्परसंवादाच्या पैलूचा परिचय करून देणे हेसुद्धा एक उद्दिष्ट आहे. खरेदी अनुभव वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने ही शोरूम डिझाइन केली आहेत.