Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

मराठा समाजाच्या प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी क्रांतीसेना मैदानात


नांदेड –सरकारशी भांडून नव्हे तर सुसंवाद आणि समन्वयातून मराठा समाजाला न्याय मिळू शकेल.राजकारण असो की समाजकारण वादातून काहीच साध्य होत नाही,समन्वय ,चर्चा आणि विचार विनिमयातून मात्र असाध्य ते साध्य होऊ शकते.म्हणूनच क्रांतीसेनेने विद्यमान महाविकास आघाडी सरकार सोबत सहकार्याची भूमीका घेऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमीका घेतली असलेचे क्रांतीसेनेचे पक्षाध्यक्ष संतोष तांबे यांनी म्हटले आहे. नुकतीच त्यांनी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची नांदेड येथे भेट घेतली. यात मराठा आंदोलकांना वरील गुन्हे मागे घेणे, सारथी ला व्यवसायाभिमुख बनवणे, तालुका स्तरावर वसतिगृह देने यावर सविस्तर चर्चा होऊन लवकर अंमललबजावणी करणार असल्याचेही संतोष तांबे यांनी सांगितले. हजारो मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि आरक्षण टिकवत सारथी ला गती देणे आवश्यक असल्याचे मान्य करून त्याबाबद्दल तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे  आणि सरकारचा  सकारात्मक प्रतिसाद असून गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अनुकूल असल्याचे नामदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले. 25 ऑगस्टच्या आत सर्व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांची बैठक घेऊन आरक्षण बाबत शासन आपली बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडत असल्याचेही सांगू आणि संवाद साधून समस्या सोडवू असे आश्वासन चव्हाण यांनी दिले. याबैठकीला मराठा आरक्षण संघर्ष समितीचे राज्य समन्वयक तथा छावा कृती समितीचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट, अखिल भारतीय क्रांतीसेनेचे राज्य सरचिटणीस नितीन देशमुख, विधी सल्लागार धनंजय चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close