Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

नायगाव तालुक्यात गाव तेथे किसान युवा क्रांती संघटना उभी करणार : संभाजी पा.शिंदे

नरसीफाटा / शेषेराव कंधारे
किसान युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून अनेक शेतक-यांचे प्रश्र सोडविण्यासाठी व कृषी योजनेची माहिती नायगाव तालुक्यातील प्रत्येक गावा गावा पर्यंत पोहचवण्यासाठी युवा शेतक-यांची चळवळ उभी करणार असुन त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणार असल्याचे किसान क्रांती संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष – संभाजी पा शिंदे अंतरगावकर यांनी नायगाव तालुक्यातील सर्वच किसान युवा क्रांती संघटनेच्या पदधिकार्याची नियुक्ती करण्यात आली यावेळी युवा शेतक-यांना मार्गदर्शन करताना केले.
किसान युवा क्रांती संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष संभाजी विश्वाभर पा शिंदे यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून नायगाव येथील मा.आ.वसंतराव चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात शनिवारी तालुक्यातील सर्वच पदधिकार्याची नियुक्ती करुन युवा नेते रविंद्र पा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अनेकांना नियुक्ती पत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नायगाव तालुका उपाध्यक्षपदी संभाजी गोविंदराव जाधव रा.मरवाळीकर तर तालुका सचिवपदी सुनिल अंबादास लुंगारे यांची निवड करण्यात आली आहे तर प्रकाश भुजंगराव हिवराळे यांची ता.उपाध्यक्षपदी,प्रभाकर मोतीराम शिंदे यांची खनिजदार पदी,
नईम ताजिदीन मोईन यांची तालुका सदस्यपदी,केशव अंनदराव शिंदे ता.सदस्यपदी,शामराव व्यंकटी तोडे यांची ता.सदस्यपदी ,माधव बालाजी हिवराळे यांची ता.सदस्यपदी,ओमकार पा जाधव यांची वि.आ.ता.अध्यक्षपदी,
सो.मी.तालुकाध्यक्ष पदी मारोती दत्ता डोईफोडे, कुंटुर सर्कल प्रमुख पदी भीमराव नागोराव हंबर्डे, बरबडा गण प्रमुख पदी मारोती नागोराव तोडे,निरंजन परशुराम डोईफोडे कुंटुर गण प्रमुखपदी,लालपाशा इब्राहिम बेग कोकलेगाव गणप्रमुख पदी,
श्रीपाल पुंडलिक मोरे यांची बरबड़ा गण प्रमुख पदी नियुक्ती पत्रक देऊन निवड करण्यात आली असून या सर्वच पदधिकार्याच्या निवडीबद्दल तालुक्यातील शेतकरी बाधवाच्या वतीने स्वागत केले जात आहे. सर्वच पदधिकार्याच्या व युवा नेते रविंद्र पा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष संभाजी विश्वाभर पा शिंदे अंतरगाव यांचा वाढदिवस यथोचित सत्कार करुन साजरा करण्यात आला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close