Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

कळंबोली येथे होणार जम्बो कोविड रुग्णालय, नगरविकास मंत्र्यांचे पालिका आयुक्तांना निर्देश

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तळोजातील लिंडे ऑक्सिजन कंपनीला भेट

बबनदादा पाटील व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागणीला मोठे यश

पनवेल /प्रतिनिधी

पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये तालुक्याच्या मनाने कोविड रुग्णांवर उपचार होणे शक्य नसल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने पाठपुरावा करून कळंबोली येथे २०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यात आले. मात्र नागरिकांच्या गरजा आणि अडचणी लक्षात घेवून महाविकास आघाडीचे नेते एवढ्यावरच न थांबता पनवेलमध्ये अजूनही जंबो कोविड रुग्णालय उभारण्यासाठी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेवून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पनवेलला भेट देवून याबाबत पाहणी करून तसे निर्देश दिले.

महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी तळोजा येथील लिंडे ऑक्सिजन कंपनीला भेट दिली. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत चाललेल्या या बैठकीमध्ये कोकण आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त श्री. गणेश देशमुख, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले, नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या भेटी दरम्यान उपस्थित असलेले रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील तसेच महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या जंबो कोविड रुग्णालयाच्या मागणीबाबत कळंबोलीमधील कॉटन कंपनी येथे जंम्बो कोविड हॉस्पिटलसाठी मान्यता देत नगरविकास मंत्र्यानी तातडीने पनवेल आयुक्तांना कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले.

जनतेची नेमकी अडचण लक्षात घेवून बबनदादा पाटील व महाविकासआघाडीच्या नेत्यांनी काही दिवसापूर्वीच मागणी केली आणि अवघ्या दोन ते तीन दिवसातच राज्याचे नगरविकास मंत्री पनवेलमध्ये दाखल झाले. आता पनवेल क्षेत्राला आणखी एक कोविड रुग्णालय महापालिकेच्या माध्यमातून मिळणार असल्यामुळे नागरीकांच्यावतीने तसेच महाविकास आघाडीच्या वतीने या तातडीच्या निर्णयाबद्दल शिवसेना जेष्ठ नेते व रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे ह्यांचे आभार मानले आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close