Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

जितेंद्र घाडगेंनी ‘पीएम केअर फंडा’बाबत पंतप्रधान कार्यालयाकडून मागवली माहिती

mh20live Network

नवी दिल्ली : कोरोनाची अभूतपूर्व परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या नागरिकांना मदतीचे आवाहन केले. ‘पीएम केअर फंडा’मध्ये अनेक सेलिब्रेटीपासून, मध्यमवर्गीय लोकांनी, कोरोनायोद्ध्यांनी, अगदी पाच वर्षाच्या चिमुकल्याने ते भिकाऱ्यांनीदेखील पैसे जमा केले. मात्र आरटीआय अंतर्गत विचारल्या गेलेल्या ‘पीएम केअर फंडा’बाबतच्या प्रश्नांना तसेच जमा झालेल्या पैशाचा हिशेब द्यायला पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला.

मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी पीएम केअर फंडाबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे माहिती मागवली होती. मात्र त्यांना ही माहिती देण्यात आली नाही. अगोदरच या फंडाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना आता पंतप्रधान कार्यालयाने उत्तर द्यायला नकार दिल्याने आता मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी या फंडाबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे चार प्रश्नांची उत्तरं मागितली होती.  पीएम केअर फंडात रक्कम जमा केलेल्या टॉप 20 दात्यांची नावं काय ?…..  पीएम केअर फंडात आतापर्यंत किती रक्कम जमा झाली ?….. पीएम केअर फंडातून खर्च केलेल्या रकमेचा तपशील किती आणि कोणता ?….. पीएम केअर फंडावर पंतप्रधानांनी नियुक्त केलेल्या 3 ट्रस्टींची नावं ?….दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने माहिती देण्यास नकार दिल्यानंतर आता विरोधक आणि सत्ताधारी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरूवात होणार आहे.


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close