Subscribe to our Newsletter
Loading
यशकथा

शेतीव्यवसायात गुळाची गोडी !

.शेतीबरोबर जोडधंदा उभा करून नवा इतिहास रचणारा उद्यमशील तरुण मनाचा उद्योजक !जालना जिल्ह्यातील राजूर येथील बळीराम भाऊसाहेब पुंगळे यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून सेंद्रिय गुळाचे उत्पादन सुरू केले. चवीला मधुर असलेल्या या गुळाला मागणी वाढत गेली. आज त्यांचा बळीराजा गूळ पंचक्रोशीत दर्जेदार म्हणून प्रसिद्ध आहे. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते, नव-नवे निर्णय घ्यायला भाग पाडते, असे म्हटले जाते. अशाच बिकट परिस्थितीतून ताणून सलाखून निघालेले, नव-नवे प्रयोग करून उद्योजगतेस दिशा देणारे तरुण मनाचे उद्योजक व्यक्तिमत्व श्री. बळीराम भाऊसाहेब पुंगळे (वय -44) यांचा यशस्वी उद्योग प्रवास. श्री.बळीरामजी म्हणतात, शेतकर्‍याने उद्यमशील व्हायला हवे, शेतीमध्ये नवे प्रयोग करायला हवेत, शेतकरी बंधूंनी शेतीला सकारात्मक नजरेतून पाहायला हवे. शेतीला जोड धंद्याची जोड दिली तर शेती ही कधीच तोट्यात जात नाही. घरची परिस्थिती नाजूक होती त्यामुळे त्यांना नाईलाजाने इयत्ता 10 वीपर्यंतचेच शिक्षण घेता आले. हे शिक्षण मिळवण्यासाठीही त्यांना खूप संघर्ष करावा लागला. राजूर या राहत्या गावापासून 10 कि. मी. अंतरावर केदरखेडा येथे दररोज शाळेसाठी पायी चालत जाऊन रामेश्वर विद्यालयात त्यांनी 10 वी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं . बळीरामजी यांना आपल्याला शिक्षण सोडावे लागणार असल्याची कल्पना होतीच, शिवाय कुटुंबाची जबाबदारी पडणार असल्याचीही जाणीव होती.यामुळे त्यांनी वडिलोपार्जित शेती करायला सुरुवात केली. त्यांना गावातील नागरिकांची मदत करायला खूप आवडे.शेतीतील मोटर फिट करू लागणे, घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती करणे, याची त्यांना आवड होती. यामुळे त्यांना पुढे चालून लाईट फिटिंगची कामे, डिश टिव्ही फिटिंगची कामे मिळू लागली. पण ही कामे नियमित नसायची, शिवाय कामाचे प्रमाणही खूप कमी असायचे. यामुळे त्यांना नेहमीच आर्थिक चणचण भासत असे. यातूनच काहीतरी नवीन उद्योग उभा करावा, नवा पर्याय शोधावा अशी कल्पना जोर धरू लागली; पण दुष्काळी भागात उद्योग चालू करणे हे तसे धाडसाचे काम होते आणि उद्योग चालला नाही तर आजपर्यंत जमा केलेले भांडवल सुद्धा हातातून जाणार, याची जाणीव बळीरामजी यांना होती.त्यांना गूळ उद्योगाचा पर्याय सुचला, त्यांनी आपल्या पत्नीला गुळ उद्योगा विषयी माहिती दिली व त्यांच्या पत्नीनेही त्यांना त्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. शेवटी स्वतःकडे आजपर्यंत पै-पै जमा करून ठेवलेल्या भांडवलाचा पुरेपुर फायदा घेऊन शेतीतच जोडधंदा उभा करण्यासाठी श्री.बळीरामजी यांनी गूळ उत्पादक होण्याचा निर्णय घेतला. पुन्हा प्रश्न उपस्थित होत होता तो गुंतवणुकीसाठीच्या अपुर्‍या भांडवलाचा.यासाठी त्यांना मदत झाली ती जिल्हा माहिती केंद्रातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजने विषयी मिळालेल्या माहितीची.लगेच त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत बँक ऑफ इंडिया या राजूर येथील शाखेमध्ये व्याज परतावा योजने अंतर्गत कागद पत्रांची पूर्तता करण्यास सुरुवात केली.आणि अल्पावधीतच त्यांना 4 लाख रुपये कर्जाची मंजुरी मिळाली.स्वतःकडील काही भांडवल, नातेवाईक मंडळींकडून काही आणि मंडळाच्या सहकार्यातून साडेसहा लक्ष रुपये रक्कम उभी राहिली. यातून त्यांनी गूळ उत्पादनास लागणारी यंत्र सामग्री खरेदी केली. शेतात एक एकर जमिनीमध्ये 30 40 शेड असा मोठया संघर्षातून प्लांट उभा राहिला आणि उत्कृष्ट दर्जाच्या गुळाचे उत्पादन सुरू करण्यात आले. श्री.बळिरामजी हे तयार करत असलेला गूळ हा केमिकल विरहित असल्यामुळे या उत्पादनाची सगळीकडे वाह वा सुरू झाली. एका वर्षभरात 18 टन गूळ युनिटवरून औरंगाबाद, पुणे, नाशिक, बुलढाणा, चिखली या ठिकाणी विक्रीसाठी गेला .बाकी गुळाच्या तुलनेत बळीराजा गूळ उत्पादनाचे उत्पादन अव्वल ठरले. केमिकल युक्त गूळ 2400 ते 2700 रुपये तर श्री. बळीरामजी यांचा गूळ 4200 रुपये बाजार भावाने विकला गेला. शिवाय 50 रुपये किलोने 5 टन गूळ प्लांट वरून ठोक विक्री करण्यात आला. गूळ उत्पादनात पाण्याची टंचाई, उसाची टंचाई या अडचणींचा सामना करत गुळाचे उत्पादन जोमात सुरू आहे. बळीराजा गूळ उत्पादन उत्पादित करत असलेल्या गुळास बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे . अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा च्या सहकार्यामुळे व्यवसाय करण्यास खूप मोठी मदत झाली असल्यामुळे श्री.बळीरामजी मंडळाचे अध्यक्ष मा.नरेंद्र पाटील साहेबांचे आभार व्यक्त करतात. सध्या पुंगळे कुटुंब आनंदात आहे. श्री.बळीरामजी यांना बळीराजा गूळ उत्पादनामधून मासिक निव्वळ 30 हजार रुपये नफा होतो. याशिवाय ते स्वतःचे एक छोटे हॉटेल चालवत आहेत. गूळ उत्पादनातून त्यांच्या कुटुंबाला लागणारा वार्षिक 3 लाखांपर्यंतचा खर्च भागवला जातो. तसेच त्यांचा मुलगा इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेतो आहे आणि मुलगी ग्रॅज्युएशन करत स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.श्री.बळीरामजी पुंगळे हे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे आभार मानतात, शिवाय नवा उद्योग सुरु करू इच्छिणार्‍यांना महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचा सल्ला ही ते आवर्जून देतात. एका वर्षभरात 18 टन गूळ युनिटवरून औरंगाबाद, पुणे, नाशिक, बुलढाणा, चिखली या ठिकाणी विक्रीसाठी गेला .बाकी गुळाच्या तुलनेत बळीराजा गूळ उत्पादनाचे उत्पादन अव्वल ठरले. बळीराजा गूळ उत्पादन उत्पादित करत असलेल्या गुळास बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे . केवळ अण्णासाहेब पाटील महामंडळ व मा.नरेंद्र पाटील यांच्या सहकार्य व आर्थिक पाठबळामुळे हे शक्य झाल्याचे सांगत ते महामंडळाचे आभार मानतात.

https://www.facebook.com/NarendraMathadi/posts/1643211509193621
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close