Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

माझं शेवटचं आंदोलन असेल’; अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला इशारा

अहमदनगर | सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. अहमदनगरमधील राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलत असताना केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला.
शेतकऱ्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून आंदोलन करत आहे, पण सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत. हे सरकार केवळ पोकळ आश्वासनं देत आहे. त्यामुळे माझा त्यांच्यावर बिलकुल विश्वास नाही, असं अण्णा हजारे म्हणालेत.
मी त्यांना जानेवारी महिन्याची मुदत दिली आहे. जर माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मी आमरण उपोषणाला बसेन. हे माझं शेवटचं आंदोलन असेल, असं अण्णांनी सांगितलंय.हजारे यांनी म्हटले आहे की, प्रत्येक राज्यात कृषीमूल्य आयोग आहेत. या कृषीमूल्य आयोगामध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांचे वेगवेगळ्या पिकांचे शास्त्रज्ञ प्रत्येक पिकांचे नांगरट, पाळी, पेरणी, बियाणे, खते, पाणी, पीक काढणे, पिक तयार करणे यासाठी लागणाऱ्या मजुरीची किंमत, बैल राबतात त्यांची मजुरी किंमत, बैल नसतील तर मशीनरीची किंमत, धान्य बाजारात नेईपर्यंत जो खर्च येतो त्याचा हिशेब काढून राज्यातून केंद्रीय कृषीमूल्य आयोगाकडे पाठवितात. केंद्रीय कृषीमूल्य आयोग हा केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यांच्या आखत्यारीत असल्यामुळे राज्यातून आलेल्या कृषीमूल्य आयोगाच्या अहवालामध्ये दहा टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत कारण नसताना कपात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चावर आधारीत भाव मिळत नाही. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक गरजांचे कपडे, भांडी यासारख्या गरजांचे भाव वाढत आहेत आणि शेतीवर होणाऱ्या खर्चाचे भाव कमी होत आहेत. म्हणून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे काही शेतकरी आत्महत्या करतात.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close