Subscribe to our Newsletter
क्राईम

घरात बसून बापलेकं छापत होते 200 रुपयांच्या बनावट नोटा

पोलिसांनी घराची झडती घेतली असता आरोपी संतोष बेलदारचे वडील बेसिनमध्ये बनावट नोटा जाळत असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याही मुसक्या आवळल्या. बनावट नोटा प्रकरणी चौघां विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संतोष बेलदारसह दोघांना अटक केली

धुळे-: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कळमसरे गावात बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्घवस्त केला आहे. पोलिसांनी छापा टाकून 200 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या बापलेकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

धुळे स्थानिक गुन्हे शाखेने बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आणला आहे. पोलिसांनी कळमसरे गावात कारवाई करत एका घरातून नोटा छापण्याचे साहित्य, कॉम्पुटर, प्रिंटर्स तसेच 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.शिरपूर तालुक्यातील कळमसरे गावात बनावट नोटा छापल्या जात असल्याची गोपनीय माहिती स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती. दरम्यान या माहितीच्या आधारे LCB पथक आणि शिरपूर पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला. यावेळी संशयित संतोष बेलदार ने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी लागलीच त्याला ताब्यात घेत अटक केली. यावेळी पोलिसांनी घराची झडती घेतली असता आरोपी संतोष बेलदारचे वडील बेसिनमध्ये बनावट नोटा जाळत असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याही मुसक्या आवळल्या. बनावट नोटा प्रकरणी चौघां विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संतोष बेलदारसह दोघांना अटक केली आहे.आरोपींनी धुळे जिल्ह्यासह आणखी कुठे कुठे बनावट नोटा चलनात आणल्या आहेत. याचाही शिरपूर पोलीस तपास करत आहे. बनावट नोटांचं मोठं रॅकेट बाहेर येण्याचा संशय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पोलिसांनी वर्तवला आहे. बनावट दारू, गांजा, अंमली पदार्थांच्या तस्करीनंतर आता थेट बनावट नोटांचा मिनी कारखाना उघडकीस आल्याने शिरपूर तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close