Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

नई दिशा शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने शेतकरी मार्गदर्शन – कृषी केंद्राचे उद्घाटन

mh20live.com

नायगाव ता/ शेषेराव कंधारे 

   शेतकऱ्यांमध्ये व्यावसायिकता आणण्यासाठी शेतकरी गट, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करित आहे. या अंतर्गत नई दिशा फार्मर प्रोडयुशन कंपनी लि. धुप्पा शंकरनगर येथे दि. १६ जुन रोजी जिल्हा कृषीधिकारी चलवंदे याच्या हस्ते शेतकरी मार्गदर्शन व कृषी केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
     यावेळी उदघाटक म्हणून जिल्हा कृषीधिकारी चलवंदे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषीधिकारी सोनटक्के, नाबार्डचे राजेश धुर्वे, नायगाव तालुका कृषी अधिकारी काळे, संस्कृतीकसंवर्धन मंडळ सगरोळी चे संचालक देशमुख, किशोर  काळे,वसंत रावणगावकर,मोहनराव पा धुप्पेकर, गणपतराव पा धुप्पेकर, माधवराव कंधारे, व्यंकटराव शिनगारे, मनोहर मोरे, रावसाहेब ताटे सहआदीं उपस्थितीत होते. कार्यक्रमांचे प्रास्तावना मारोतराव वडे यांनी केले तर सुत्रसंचालन गंगाधर पा धुप्पेकर यांनी केले. आभार धोंडिबा पा सुपारे यांनी मानले. 
               धुप्पा शंकरनगर ता नायगाव येथे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात गट स्थापन करण्यात आले आहे.सदर शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने परिसरातील शेतक-यांना रासायनिक खते बि बियाणे व कीटकनाशके अल्पदरात पुरवठा करुन उत्पादनाबाबत मार्गदर्शन आणि शेतक-यांनी उत्पादित केलेल्या कृषि मालाचे विक्री व्यवस्थापन याबाबत कार्यरत राहुण कंपनी थेट ग्राहकांना कृषि मालाच्या विक्रीच्या संधी उपलब्ध करुन देवुन मध्यस्थांना मिळणारी रक्कम शेतकऱ्यांना मिळेल व शेतमाल विक्री खर्च कमी होईल तसेच शेतक-यांच्या कच्चामाल पक्का करुन विक्री करणे यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढवणे तसेच वाहतुक खर्चात मोठया प्रमाणात बचत होईल व शेतक-यांचा चागंला फायदा होईल असे जिल्हा कृषीधिकारी चलवंदे यांनी धुप्पा शंकरनगर ता नायगाव येथील नई दिशा शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने शेतकरी मार्गदर्शन व कृषी केंद्राचे उदघाटन करण्यात आले यावेळी उदघाटक म्हणून ते बोलत होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बजरंग पाटील,त्र्यंबक डोंगळे,अनिल जांभळे, माधव दरेगावे,  संतोष डुकरे, उध्दव कंधारे,  देवीदास पाटील सह आदी परीश्रम घेतले. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close