Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

नायगांव नगरपंचायतमध्ये सन्मानपूर्वक जागा नाही मिळाल्यास शिवसेना स्वबळावर शक्तीनीशी लढविनार – जिल्हाप्रमुख उमेश मुंडे


नायगाव ता/ शेषेराव कंधारे 

        आगामी नायगाव नगर पंचायत निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळत सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास उत्तमच. आम्ही आघाडीचा धर्म पाळावयास तयार आहोत. पण तसे न झाल्यास शिवसेना पूर्ण शक्तीनिशी सर्व म्हणजे सतरा जागा लढविणार असल्याचा इशारा जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांनी दिला. ते नायगाव  शहरप्रमुख माधव पा. कल्याण यांच्या संपर्क कार्यालयात नगर पंचायत निवडणूक पूर्व तयारी कार्यकर्त्याच्या बैठकीत बोलताना केले . 
       यावेळी जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, तालुकाप्रमुख रवींद्र पा. भिलवंडे, शहर प्रमुख माधव पा कल्यण, ओमप्रकाश धुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी अभिवादन केल्यानंतर प्रास्ताविकातून माधव कल्याण यांनी नायगाव नगरपंचायत निवडणुकीची एकंदरीत पार्श्वभूमी मांडली. तर अनेक शिवसैनिकांनी आपण नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत अशा सूचना जिल्हाप्रमुखांसमोर मांडल्या.
       मुंडे बोलताना पुढे म्हणाले की, शिवसेनेचा कार्यकर्ता पैसा, जमीनवाला नसतानाही केवळ त्यांची धडपड व सामाजिक योगदान पाहूनच लोकांची मने तो जिंकतो, आता तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खंबीर नेतृत्व आपल्यासोबत आहे. माधव कल्याण सर्वांच्या मदतीला धावून गेल्यानेच त्यांना यापूर्वीही शहरवासीयांनी संधी दिली. आपण त्यांच्यासोबत व पक्षासोबत असल्याने शिवसेना पक्षही आपल्या बळकटीकरणासाठी सोबत असेल असे कार्यकर्त्यांना स्फूर्तीदायक विचार मुंडे यांनी मांडले. एवढेच नाही तर नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा नाही मिळाल्या तर
शिवसेना स्वबळावर सतराच्या सतरा जागा निवडणूक लढणार व नायगाव नगरपंचायतवर भगवा फडकविणार असा विश्वास श्री. मुंडे यांनी व्यक्त केले. 
     यावेळी शेरसिंग टाक, निशांत पवार, केशव खंडागळे, साईनाथ कल्याण, विशाल व्यवहारे, युवराज भद्रे, रितेश कल्याण, सचिन हनमंते, सचिन हनमंते, शंकर पाटील कल्याण, आकाश हनुमंते, हिंमत सिंग टाक, भूषण काळेवार, राम चितेंवाड, विश्वंभर बोयाळ, कैलास पवार, अक्षय राजकुंडल, गजानन कुंचलवार, अतुल पांपटवार, सिताराम पवार, सूर्यकांत कुरे, निळकंठ हांडे, नारायण सूर्यवंशी, राजेश हटकर, नयुम शेख, प्रवीण हनुमंते यांची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close