६ वर्षीय मुलाची दृष्टी वाचवण्यात यश
पुणे,- माधव जोशी (नाव बदललेले) हा सहा वर्षीय मुलाच्या एका डोळ्याची जन्मतः अपूर्ण वाढ झाल्याने तो दृष्टिपटल सरकणे ने त्रस्त होता. त्याला एका डोळ्याने दिसत नसत. अधिक काळ याचा इलाज न केल्यास संपूर्ण दृष्टी जाण्याचा देखील धोका होता. या आजारास वैद्यकीय भाषेत मायक्रॉपथलमिया, मायक्रो कॉर्नेया आणि कोबोलोमा असे म्हणतात. त्याच्यावर औधच्या डॉ अग्रवाल्स आय केअर हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली व आता त्याची दृष्टी व्यवस्थित झाली आहे.
यामध्ये, लहान मुले साधारणपणे लहान आणि पूर्ण विकसित न झालेल्या डोळ्यांनी जन्माला येतात. कॉर्निया देखील खूप लहान 10 मिमी पेक्षा कमी व्यासाचा असतो तसेच डोळा बनवणाऱ्या पेशींचा काही भाग देखील गहाळ असतो. या परिस्थितीमुळे त्याच्या रेटिनाची पूर्णपणे वाढ झाली नव्हती व त्याला त्याडोळ्याने जेमतेम दिसत होते आणि जर यावर उपचार केला नसता तर त्याची पूर्णपणे दृष्टी जाण्याचा धोका निर्माण झाला होता.
डॉ. सुधीर बाबुर्डीकर, वरिष्ठ नेत्रपटल विशेषज्ञ, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल, औंध, पुणे, ज्यांनी आव्हानात्मक शस्त्रक्रिया केली ते म्हणाले “ज्या डोळ्यांचे विविध स्तर जन्मत:च पूर्णपणे विकसित झालेले नाहीत त्यांना रेटिनल डिटेचमेंट होण्याची शक्यता असते. यामध्ये डोळ्याच्या मागील बाजूस नेत्रपटल त्याच्या सामान्य स्थितीपासून दूर खेचले जाते आणि रुग्ण सामान्यपणे पाहू शकत नाही. ही वैद्यकीय आणीबाणी आहे. माधवच्या डोळ्यात जन्मापासूनच असलेल्या कमी-विकसित थरांमुळे त्याचा रेटिना वेगळा झाला होता व त्याला तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज होती, अन्यथा तो अखेरीस पूर्णपणे आंधळा झाला असता.”
डॉक्टर पुढे म्हणाले: “हे खूप आव्हानात्मक काम होते. मुलाचे डोळे लहान आणि विकसित नसल्यामुळे, शस्त्रक्रिया करण्यासाठी आमच्याकडे खूप कमी जागा उपलब्ध होती.शिवाय, डोळ्यांची लेन्स खराब होण्याचा धोका होता. प्रक्रियेसाठी उत्कृष्ट कौशल्य आवश्यक होते. दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर, आम्ही मुलाचा रेटिना त्याच्या जागी व्यवस्थित जोडण्यात यशस्वी झालो. त्याची पाहण्याची क्षमता आता कमालीची सुधारली आहे आणि त्याची दृष्टी त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी जतन केली गेली आहे. प्रक्रिया यशस्वी झाली आहे.”
पूर्वीच्या निराशाजनक परिस्थितीत दृष्टी आणि आशा पुनर्संचयित करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियांच्या दीर्घ यादीतील ही शस्त्रक्रिया नवीनतम आहे. डॉ. सुधीर बाबुर्डीकर म्हणतात की मुलाच्या दृष्टीमध्ये कोणतीही विसंगती लवकर लक्षात येण्यासाठी पालकांनी जागरुक राहणे आवश्यक आहे जेणेकरून ते विलंब न करता योग्य वैद्यकीय मदतीसाठी त्यांच्या बालरोगतज्ञ आणि नेत्ररोग तज्ञांचा सल्ला घेऊ शकतील.
“माधव आमचा एकुलता एक मुलगा आहे. डोळ्यांच्या अविकसिततेमुळे तो नीट पाहू शकत नाही आणि तो आंधळा होण्याचा धोका होता हे पाहून आमचे मन दुखावले. आमच्या मुलाला व्यवस्थित बघता येईल का या शंकेने , या शस्त्रक्रियेपूर्वी आम्ही खूप चिंतेत होतो. माझ्या मुलाची दृष्टी वाचवल्याबद्दल मी डॉ. सुधीर आणि सर्जिकल टीममधील इतरांचे मनापासून आभार मानतो. तो आता त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे निरोगी प्रौढ होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.” असे प्रतिपादन मुलाच्या आईने केले आहे.