Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

तेली समाजाचे कार्य मी तन-मन-धनाने करेल आणि संघटना देईल ती जबाबदारी प्रमाणीक पणे पार पडेल – अनिल मकरिये यांचे प्रतिपादन

औरंगाबाद:तेली समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे.सर्व समावेशक भूमिकेतून मी औरंगाबाद शहरातील तेली समाजाच्या सर्व संघटनेला योग्य ती मदत करीत आलो आहे.तेली समाजाचा सर्वंगीण विकास व्हावा अशी भावना माझी आहे.तेली समाज हा कष्टकरी स्वाभिमानी समाज आहे.या समाजाचे ज्वलंत प्रश्न अजूनही सुटलेले नाही.तेली समाज लग्नगाठ पुस्तिकाच्या वधु-वराच्या फार्मचे विमोचन भाजपा व तेली समाजाचे नेते मा.श्री.अनिलभैय्या मकरिये यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या वेळी ते बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की आगामी काळात समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझा पुढाकार राहिल.खासदार तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष श्री.रामदास तडस साहेब,मा.मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब,आमदार मा.श्री संदिपभैय्या क्षीरसागर,महासचिव भूषणजी कर्डिले,कोषाध्यक्ष मा.श्री.गजानन शेलार यांच्या कडे समाजाच्या प्रगतीचा दुष्टीकोन असून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.आता मलाही त्यांनी संघटनेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी दिल्या बद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.संघटना जी जबाबदारी देईल ती मी प्रमाणीक पणे पार पाडील असेही शेवटी अनिलभैय्या मकरिये म्हणाले.या प्रसंगी जेष्ठ समाज सेवक सुधाकर थोरात,किराणा चावडी तिळवण तेली समाज मंगल कार्यालयाचे अध्यक्ष रमेशभाऊ क्षीरसागर,जेष्ठ समाज सेवक अशोक लोखंडे,युवा समाज सेवक सुनिल क्षीरसागर,अनिल क्षीरसागर,विशाल नांदरकर,कूष्णा लोखंडे,नितीन तावडे,गजेंद्र तोंडे,कपिल क्षीरसागर,समाज भगिनी कविताताई वाघमारे,प्रियंका फल्ले,निमंत्रक व संपादक गणेश पवार,आदींची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close