Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

पालघरच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका, जिल्हा प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

पालघर | mh20live network

१ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीवर बंदीचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला होता व त्या अनुषंगाने ३१ मे पर्यंत परवाने दिले गेले होते. तरीदेखील सुमारे शंभर ते दीडशे बोटी १ जून नंतर देखील समुद्रात विनापरवाना मासेमारी करीत असल्याचे आढळून आले होते. चक्रीवादळाच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या बोटींनी तातडीने माघारी फिरावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी रविवारी दिल्यानंतर देखील १०० बोटी सोमवार सायंकाळीपर्यंत समुद्रात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली होती.
तसेच मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कच्चा घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पक्क्या घरात, शाळेत अथवा निवारा केंद्रात आश्रय घ्यावा, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनामार्फत किनारपट्टीतील गावोगावी जाऊन चक्रीवादळाच्या वेळी घेण्यात येणाऱ्या खबरदारी विषयी माहिती व जनजागृती केली जात आहे. येणाऱ्या आपत्तीशी लढण्यास पुरेपूर साधन-सामग्री उपलब्ध असून आपत्तीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन एनडीआरएफ पथकामार्फत करण्यात आले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close