Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

हार्पिक मिशन पानी कडून प्रजासत्ताक दिनाला भारताची सर्वात मोठी वॉटरथॉन आयोजित

o   प्रमुख पॉलिसीमेकर्स, सीलेब्रिटीज आणि कॉर्पोरेट्स यांनी वॉटर हीरोज चे केलेगुणगान

o   8-तास चालणाऱ्या या वॉटरथॉन ने स्वच्छतेसाठी पाण्याचे महत्व सांगीतले

नॅशनल,: ज्या दिवशी भारताने त्याचा 72वा प्रजासत्ताक दिन साजरा केला, त्याच दिवशी हार्पिक मिशन पानी ने देशातील वॉटर हीरोज चे गुणगान करण्यासाठी त्यांच्या प्रथम वॉटरथॉन चे आयोजन केले. 8-तास चालणाऱ्या या वॉटरथॉन ने प्रमुख पॉलिसी मेकर्स, सर्व क्षेत्रातील सीलेब्रिटीज, सेना व कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती यांना एकत्र आणले व स्वच्छता आणि संधारणासाठी पाण्याचे महत्व या विषयावर संबोधन केले.

भारताच्या सर्वात मोठ्या वॉटरथॉन मध्ये अनेक विचारांना प्रेरणा देणारे सेशन्स होते ज्यामध्ये जल संरक्षणासाठी प्राथमिक स्तरावर करण्याच्या प्रभावी उपायांवर चर्चा करण्यात आली. मिशन पानी ने लहान मुलांमध्ये पाणी वाचवण्याच्या सवयी बालपणीच लावण्याच्या दृष्टीने वॉटकस्कुल करीक्युलम चा वापर करण्यासाठी डब्ल्युडब्ल्युएफ-इंडिया आणि स्वारोस्की वॉटरस्कुल बरोबर भागीदारी केली.

लक्ष्मण नरसिंहनग्लोबल CEO, रेकीट बेंकीझर ग्रुप म्हणाले, “आरबी येथे प्रजासत्ताक दिनाला भारताची सर्वात मोठी वॉटरथॉन आयोजित करणे आमच्यासाठी अत्यंत प्रतीकात्मक आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. सर्व क्षेत्रातील लोक हार्पिक मिशन पानी प्लॅटफॉर्म वर एकत्र आले,पाणी वाचवण्याच्या सामाईक उद्देशासाठी सर्वांची एकी झाली. या दिवशी भारतातील वॉटर हीरोंची प्रशंसा करण्यात आली ज्यांनी स्वच्छतेसाठी पाण्याचे मह्त्व पटवून सांगण्यासाठी निस्वार्थपणे काम केले. आम्हाला आशा आहे की हार्पिक त्याच्या महत्वपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मिशन पानी च्या मदतीने जल संधारणाच्या दृष्टीने लोकांच्या वर्तणूकीत बदल घडवून आणण्यात यशस्वी होईल.

हॅरोल्ड वँडन ब्रोक, अध्यक्ष, आरबी हायजिन, परपज-लेड ब्रान्ड्स विकसीत करण्यावर बोलताना म्हणाले, “आरबी येथे, आम्ही आरोग्य, स्वच्छता आणि पोषण याचे प्रणेते आहोत आणि आम्ही आमचे उद्दिष्ट आहे-स्वच्छ व निरोगी जीवनाकरिता सतत संरक्षण करणे, बरे करणे व पोषण करणे. आम्ही युएन कडून सांगण्यात आलेल्या निरंतर विकासाच्या उद्देशांनुसार समाजातील महत्वपूर्ण समस्यांविरुद्ध लढण्याशी संबंधित ब्रान्ड्स तयार करण्यास बांधील आहोत.

अभिनेता व मिशन पानी अँबेसेडर, अक्षय कुमार म्हणाले, पाणी म्हणजे आपण वाचवलीच पाहिजे अशी संपत्ती आहे. पुढच्या 9 वर्षात पाण्याची मागणी 40 टक्क्यांनी वाढणार आहे, जी आपण कदाचित पूर्ण करु शकणार नाही. तसेच, देशाच्या 28% भागामध्ये पाण्याचा दुष्काळ पडेल ज्यासाठी आपण सर्वजण जबाबदार असणार आहे. ज्या दिशेने माणुसकी चालली आहे, त्यानुसार पुढील 10 वर्षात उपलब्ध असलेले सगळे पाणी आपण संपवणार आहोत. पाणी सोन्याच्या भावाने, किंवा त्यापेक्षा जास्त दराने विकले जाण्याची शक्यता आहे. कदाचित आपल्याला त्यावरुन युद्ध बघायला मिळेल. कदाचित अशीही वेळ येईल जेव्हा नद्या, तलाव नसतील. आपल्याला एका थेंबासाठी सुद्धा धडपड करावी लागेल. आता वेळ आली आहे पाणी वाचवण्याची प्रतिज्ञा करण्याची जेणे करुन आपण उद्याचा चांगला दिवस पाहू शकलो पाहिजे.

या प्रसंगी नरसिंहन इश्वरवरीष्ठ उपाध्यक्षदक्षिण आशिया, RB हायजिनम्हणाले, पाण्याची बचत करणे आता पहिलेपेक्षाही जास्त महत्वाचे झाले आहे.या महामारीने आपल्याला शिकवले हे की उच्च दर्जाचे सॅनिटेशन व स्वच्छता समाजातील प्रत्येक घटकासाठी आवश्यक असते. हार्पिक मिशन पानी ही लोकांची चळवळ आहे ज्यामध्ये थेट पाणी, स्वच्छता आणि सॅनिटेशन वर भर देण्याच्या हेतूने कार्य केले जाते. हार्पिक मिशन पानी च्या स्वच्छता और पानी अभियानाद्वारे आमचा हेतू पाण्याचा दक्षतापुर्ण वापर करण्याबाबत जनजागृती करण्याचा आणि जल संधारणतसेच स्वच्छता व सॅनिटेशन याबाबत प्रोत्साहन देण्याचा आहे.

सुखलीन अनेजासीएमओ व मार्केटींग डायरेक्टरआरबी आयजिन, दक्षिण आशिया म्हणाले,लहान मुले आपले भविष्य आहे आणि त्यामुळे मिशन पानी चे ते उत्तम प्रचारक आहेत. हार्पिकच्या मिशन पानी आम्हाला टिकणारा वर्तणूक बदल घडवून आणायचा आहे. मागच्या वर्षी आम्ही लीजेंडरी ए आर रहमान बरोबर वॉटर अँथम/पाण्याची प्रार्थना रीलीज केली जी लहान मुलांच्या समूहाने प्रस्तुत केली ज्यामध्ये भारताला पाण्याचा वापर जबाबदारीने करण्याची विनंती करण्यात आली आहे. यावर्षी मिशन पानी ने डब्ल्युडब्ल्युएफ-इंडिया आणि स्वारोस्की स्कुल ऑफ वॉटर बरोबर वॉटर करीक्युलम ची सुरुवात करण्यासाठी व लहान मुलांनी जल संधारणाचे महत्व बालपणीच शिकवण्यास गतिशील करण्यासाठी भागीदारी केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close