Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादशेतीविषयक

लाडसावंगी परिसरात गारांचा मारा शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले

लाडसावंगी /निलेश चोधरी
लाडसावंगी परिसरात गारांचा मारा तालुक्यातील लाडसावंगी व आसपासच्या परिसरात अचानक गारपीट झाली. अचानक आलेल्या अवकाळी गारपीटने परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिनावला.

गहू, ज्वारी, हरभरा,डाळिंब, मक्का पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विद्युत अडचणींचा सामना करत शेतकऱ्यांनी पिके फुलवली होती. पण अश्या अचानक गारपीट ने सर्व काही जमिनोध्वस्त झाले.यामुळे आता शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

परिसरात अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, हरभरा, मक्का आदी पिके शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास खराब झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. बुधवारी दुपार नंतर वातावरणात अचानक बदल जाणवायला सुरूवात झाली होती. सायंकाळी लाडसावंगी आणि परिसरात अचानक गारा पडल्या. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. याचा फटका आंबा, डाळिंब, मोसंबी आदी फळांनाही बसलाय. ऐन बहरात असलेल्या आंब्याचा मोहर यामुळे गळून पडला आहे.

मराठवड्यात अनेक शेतकरी मोसंबी आणि डाळिंब या फळांची लागवड करतात. डाळिंबाला सध्या फुले लागलेली होती. मात्र, अचानक झालेल्या या गारपीटीमुळे डाळिंबाची फुले पडली आहे. आधीच अवकाळी नंतर अतिवृष्टी यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. त्यानंतर महावितरण वीज कनेक्शन कट करण्याच्या भीतीने शेतकरी त्रस्त होते. त्यात आता या गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले असून याचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी करण्यात आलीय.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close