Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

भोकरदन शहरासह तालुक्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भोकरदन/सुरेश गिराम

भोकरदन शहरासह तालुक्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन
भोकरदन शहरासह तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यात तसेच वाड्या वस्त्यांवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रविवारी 6 डिसेंबर रोजी अभिवादन करण्यात आले.
भोकरदन शहरात सकाळी रमाई नगरातील अशोका बुद्ध विहारात सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच प. पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने सिल्लोड रोडवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला समितीचे सचिन पारखे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


सदरील कार्यक्रमास नगरसेवक दिपक बोर्डे, नगरसेविका निर्मला ताई भिसे, नगरसेवक कदिर बापू, शामराव दांडगे, ऍड. डी एस जाधव, प्रा टी आर कांबळे, प्रदीप जोगदंडे, रमेश भाई पगारे, बाबुराव पगारे, प्रा अशोक
नवगीरे,डॉ प्रभाकर बोर्डे, किशोर बनकर, सुरेश बनकर, युवराज पगारे, विशाल मिसाळ, भगवान बोर्डे, कमलकिशोर जोगदंडे, दिपक दाभाडे,सोमनाथ बिरारे, बनकर बाई, राऊत बाई यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते तसेच भीम आर्मी व इतर संघटना च्या वतीने अनिल पगारे यांच्यासह पदाधिकारी यांनी सिल्लोड रोडवरील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close