Subscribe to our Newsletter
Loading
ब्लॉग्ज

थोर संत संताजी जगनाडे महाराज

mh20live newtork

संत संताजी महाराजांचा जन्म ०८ डिसेंबर १६२४ रोजी चाकण (पुणे) येथे झाला, महाराष्ट्र हि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते,आणि या पावन भूमीत संतांच्या कार्याचा ठसा उमटलेला दिसतो.संत संताजी जगनाडे महाराज म्हटलं की,सोबत तुकाराम महाराजांचा इतिहास आपल्या डोळ्या समोर उभा राहतो.त्यांचे जन्म नाव संतू ठेवण्यात आले, संतू दहा वर्षाचे असतांना चाकण येथे
तुकाराम महाराज कीर्तनासाठी येणार हे कळाले असता गावकरी कीर्तन ठिकाणी साफ स्वच्छता करत.संताजी महाराज त्यांच्या
वडीलांसोबत तुकाराम महाराजांच्या कीर्तनासाठी पोहोचले. त्या दिवशीच्या तुकाराम महाराजांच्या विचारांना पेरीत होऊन संताजी
महाराजांनी तुकाराम महाराजांची भेट घेतली. तुकाराम महाराज कीर्तनातून समजला उपदेश करत, भक्ती हि श्रेष्ठ,देवाच्या दारी उच्च
निच्च भेदभाव नाही,परमार्थ साधनेसाठी संसार सोडणे नाही. संताजी महाराज विचारांना प्रेरित होऊन,पुढे तुकाराम महाराजां सोबत
त्यांचे विचार समाजापुढे ठेऊ लागले,तुकाराम महाराजांच्या सुरवातीच्या टाळकरी मध्ये समावेश झाला.त्या दिवशी पासून संताजी संत
झाले. तुकाराम महाराज म्हणत ” संताजी तेली बहुत प्रेमळ | अभंग लिहीत बैसे जवळ ” तुकाराम महाराज आपल्या कीर्तनातून
अंधश्रद्धा,पाखंडी पणा, बुवाबाजीवर प्रहार करीत. धर्मज्ञान संस्कृत भाषेत होते,संस्कृत भाषेचे ज्ञान शास्त्री मंडळींनाच होते.तुकाराम
महाराजांचे विचार उभ्या महाराष्ट्रात पसरले होते,छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील कीर्तनास उपस्थिती असत ,पुण्याच्या तुळशी
बागेत संत तुकाराम महाराजांची भेट छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली व स्वराज्याच्या कार्यासाठी आशीर्वाद घेतले त्या वेळेस संत
संताजी महाराज देखील उपस्थित होते.
संतांची कार्य येणाऱ्या पिढी समोर ठवण्याचे काम सर्व संतांनी केले आहे. आजच्या युवकांच्या हाती सर्वांगीन विकासाचे सूत्र असे
कि,शिक्षण आरोग्य आपल्या क्षेत्रात यशस्वी होणे हा आहे.पण त्याच सोबत तुकाराम महाराजांच्या व संताजी महाराजच्या विचाराची
देणगी आजच्या युवकांनी आत्मसात केली पाहिजे. ज्यावेळी तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी मध्ये प्रतिगाम्यांनी बुडवल्या,हि
बातमी कळताच तुकाराम महाराज अन्न पाणी सोडून बसले, त्यावेळी संत संताजी जगनाडे महाराजांनी गावोगावी जाऊन त्या गाथा
पुन्हा लिहून तुकाराम महाराजांचे उपोषण सोडवले. साडे तीनशे वर्षा पूर्वी शिक्षणाचे महत्व संताजी जगनाडे महाराज यांनी दिले. आज
आठरा भाषेत तेरा देशांत तुकाराम महाराजाच्या गाथा आपल्यात जिवंत ठेवण्याचे काम, संत संताजी महाराजांनी ठेवले. आपण
तुकाराम महाराजांचे जीवन बघितले तर आपल्या लक्षात येईल, कि लोकहिताच्या कार्य करत असतांना देखील संघर्ष करावा लागला.
आपला महाराष्ट्र विचारांच्या व ज्ञानाच्या जोरावर मोठा झाला पाहिजे याचे बीज तुकाराम महाराजांनी रोवले होते.माणुसकीचा व
एकमेका साह्य करण्याचा धर्म मोठा या विचारांचा महाराष्ट्र म्हणून जगात ओळख आहे.ज्या गाथा संत संताजी महाराजांनी लिहून
काढल्या यांनी ज्ञानाची ताकद काय असते. हे दाखून दिले आहे.आपल्या साठी लिहून ठेवलेल्या गाथा ह्या डोक्यावर घेण्यासाठी नसून त्या
वाचून डोक्यात घ्यावे. जीवनात पडत असलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यात आहे.आई वडिलांचा सांभाळ करणारी किती मुले आहे, याचा जर
शोध आपण घेतला तर आपल्याला कळेल आई वडिलांना मुले वृद्धा आश्रमात सोडत आहे. आई वडील हे आपले दैवत आहे असे देखील
प्रभोधनातून संत सांगतात.संताजी महाराजांनी लिहिलेले ग्रंथ कृष्णदीपिका ,स्वानंद बोध,प्रकाशदीप,योगाची वाट,निगुणाचा मार्ग,
तेली सिंधू,शंकर दीपिका,यासारखे ग्रंथ संत संताजी जगनाडे महाराज यांनी लिहिले आहे.
तेली झालो तेली झालो | घाना वायाशी शिकलो |
घाणा बुद्धीचा बळकट | आत विवेकाची लाट |
आशा माशा तेल काढू | वासनेची ढेप कोंडू |
ऐसे कडुनिया तेल | संत पेठेत विकेल |
संतू तेली घाणा काढी |तोटा नाही कधी काळी |

सोमनाथ दिगंबर सुरडकर
औरंगाबाद.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close