Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

वेश्या व्यवसायातील महिलांना सरकारचा मोठा दिलासा; दरमहा आर्थिक मदत मिळणार

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ ओढावलेल्या वेश्या व्यवसायातील महिलांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबरच्या काळात या महिलांना दरमहा पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर ज्या महिलांची मुले शाळेत जातात त्यांना अतिरिक्त 2500 रुपयांची मदत दिली जाईल. महाविकासआघाडी सरकारच्या या निर्णयामुळे वेश्या व्यवसायातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी

महाराष्ट्र सरकारने गुरुवारी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 30 हजार सेक्स वर्कर्सना कोविड 19 च्या संकटा दरम्यान मदत दिली जात होती. 32 जिल्ह्यांशिवाय इतर जिल्ह्यांमधील सेक्स वर्कर्सची माहिती मिळवली जात आहे.
हे ही वाचा-धक्कादायक! रुग्णालयात कुत्रा कुरतडत राहिला मुलीचा मृतदेह; लोक करण्यात दंग

ओळखपत्रासाठी दबाव आणू नये

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी संबंघिक विभागाला आदेश दिले आहेत. ही मदत देताना कोणत्याही महिलेकडून ओळख पत्र दाखविण्याचा दबाव आणू नये. सरकारी आकड्यांनुसार पुण्यात 7011, नागपूर 6616, मुंबईत 2687 आणि मुंबई उपनगरात 2305 सेक्स वर्कर्स आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेशGovernment’s great relief to women in the prostitution business; Get financial help every month

यशोमती ठाकूर यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हा आदेश दिला आहे की, ते आपल्या आपल्या भागाची यादी करून पाठवावी. याशिवाय हे देखील सांगावं की कशाप्रकारे अतिरिक्त मदत खाद्य पदार्थांच्या रुपात या सेक्स वर्कर्सना पोहोचविण्यात येऊ शकते. सरकारच्या आदेशानंतर जिल्हा स्तरावर तयार केल्या जाणाऱ्या समितीत महिला अधिकाऱ्यांशिवाय नाको (NACO) च्या स्थानिक प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांचे लोकही सामील होतील. या समितीत महिला आणि बाल कल्याण विभागातील अधिकारी सचिव म्हणून काम करतील.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close