Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

संत निरंकारी मंडळाचे महासचिव पूज्य ब्रिगेडियर (से.नि.) पी.एस.चीमा जी ब्रह्मलीन


दिल्ली:
संत निरंकारी मंडळाचे महासचिव आणि मिशनचे समर्पित संत पूज्य
ब्रिगेडियर (से.नि.) पी.एस.चीमाजी यांनी आज दि.१२ मे, २०२१ रोजी सकाळी १०.१५ वाजता दिल्ली
येथे आपल्या नश्वर देहाचा त्याग केला आणि निराकार ईश्वरामध्ये विलीन झाले. त्यांचे वय ७२ वर्षे
इतके होते.
पूज्य चीमाजी यांचा जन्म १४ मार्च, १९४९ रोजी आध्यात्मिकतेच्या रंगात रंगलेल्या कुटुंबात
झाला. १९५६ मध्ये वयाच्या अवघ्या ७व्या वर्षीच त्यांना तत्कालीन सद्गुरु बाबा अवतारसिंहजी यांच्या
कालखंडात ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. ते अत्यंत मेहनती, इमारदान व बुद्धिमान व्यक्तीमत्वाचे
स्वामी होते. एक निष्ठावान गुरु भक्त असण्याबरोबरच खेळ आणि शिक्षणामध्ये त्यांना विशेष रुची
होती. पुढे जाऊन भारतीय सैन्यदलामध्ये एक कर्तबगार आर्मी ऑफिसर म्हणून त्यांनी सेवा निभावली.
सैन्यदलामध्ये असताना ते त्यांच्या सहकाऱ्यांसाठी चांगुलपणा, इमानदारी आणि दृढ विश्वासाचे
प्रेरणास्रोत बनून राहिले. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या शुभहस्ते त्यांनी
डीआरडीओ टेक्नॉलॉजी ॲवॉर्ड मिळाले होते.
सन २००६ मध्ये सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी यांनी पूज्य चिमाजी यांना संत निरंकारी मंडळाच्या
वर्किंक कमिटीचे सदस्य म्हणुन नियुक्त केले. त्यानंतर एप्रिल २००७ मध्ये त्यांना मंडळाच्या
कार्यकारिणी समितीमध्ये समाविष्ट करुन समाजकल्याण, आरोग्य आणि मेडिकल विभागाची जबाबदारी
देण्यात आली. याच वर्षी त्यांना ज्ञान प्रचारक म्हणूनही सेवा प्रदान करण्यात आली. २०१० मध्ये
स्थापन करण्यात आलेल्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. मिशनच्या
वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी सन २०१८ मध्ये त्यांना मंडळाचे महासचिव म्हणून
सेवा प्रदान केली व आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, सुरक्षा, स्टुडिओ आणि दूरसंचार विभागांचा कार्यभार
सोपविला होता जो त्यांनी अंतिम क्षणापर्यंत निभावला. मिशनच्या निर्माणाधीन हेल्थ सिटी
प्रोजेक्टमध्ये ते अहम भूमिका निभावत होते.
पूज्य चीमाजी ब्रह्मलीन झाल्याने संत निरंकारी मिशनचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यांचे
अनमोल जीवन येणाऱ्या पीढ्यांसाठी सदोदित प्रेरणास्रोत बनून राहील.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close