Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

गंगापुर : दोन दुचाकींचा समोरासमोर अपघातात बाभूळगाव येथील एक ठार, चार जण गंभीर





औरंगाबाद/ गुलाब वाघ
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यातील लासुरस्टेशन-नागरे बाभुळगाव रस्त्यावरील समृद्धी मार्गाच्या पुलाजवळ सायंकाळी साडे सहाच्या सुमरास दोन दुचाकींचा समोरासमोर अपघाताची घटना घडली असून यात एक जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रमेश लक्ष्मण जाधव वय ३५ राहणार नागरे बाभुळगाव असे ठार झालेल्याअल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान शिल्लेगाव पोलिसाकडून मिळालेल्या माहीतीनुसार लासूर स्टेशन ते नागरे बाभुळगाव रस्त्यावर दोन मोटर सायकलची समोरासमोर जोरदार अपघात झाल्याने या अपघातात रमेश लक्ष्मण जाधव याचा मुत्यु झाला असून सुखदेव निकम ना.बाभुळगाव,बाळु काळवणे मा.वाडगाव व आणखीन दोघेजन जखमी झाले असून त्यातील एक जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरक्षक रविंद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनिरीक्षक सतीश दिंडे पोलीस कर्मचारी दादाराव तिडके,विठ्ठल जाधव आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून अपघाताची माहिती घेतली यातील गंभीर जखमी असलेल्या नागरे बाभुळगाव येथील रमेश लक्ष्मण जाधव यास येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील डाॅ वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले रमेश लक्ष्मण जाधव वय 35 ना बाभुळगाव हा अल्पभुधारक शेतकरी असून वेल्डरचे काम करून कुंटूबाचा उदनिर्वाह करत होते त्यांना तीन एकर जमीन असून काही कामा निम्मित लासूर स्टेशन कडे येताना मोटार सायकल च्या अपघातात त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परीवार आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close