Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

आजची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी गांधीजींचे अर्थशास्त्र महत्वाचेच

 महात्मा गांधी विचार अभ्यासक अण्णामलाई यांचे एमजीएमच्या व्याख्यानात मत


औरंगाबाद: महात्मा गांधी काळाची गरज आहेत. ते लोकांना माहीत आहेत मात्र संपूर्ण नाही. गांधी समजून घेण्यासाठी आपण आधी गांधीजीनाच संपूर्णतः विसरून शिकावे लागेल. कोणताही पूर्वग्रह न बाळगता त्यांना जाणून घ्यावे लागेल तरच वास्तविक गांधी कळतील,  आजची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी गांधीजींचे अर्थशास्त्र महत्वाचेच, अशी भावना  प्रसिध्द गांधी तत्वज्ञान अभ्यासक आणि विचारवंत अलागन अण्णामलाई (संचालक, गांधी संग्रहालय, नवी दिल्ली) यांनी व्यक्त केली आहे.
वाचा सविस्तर news पोलीस दलातील महिला बीट अंमलदार जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडतील :गृहमंत्री अनिल देशमुख


महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘गांधी समजून घेताना’ या विषयावर अण्णामलाई यांच्या व्याख्यानाचे एमजीएममध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलसचिव प्रा.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.रेखा शेळके, प्रा.बाळासाहेब सराटे, प्रा. वैशाली चौधरी आदींची उपस्थिती होती. 
बहिणी-बहिणीची शेती ! निसर्ग पुरक शेती :वाचा सविस्तर news

अण्णामलाई पुढे म्हणाले, आपण खरंच गांधी समजून घ्यायला तयार आहोत का? हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. कारण, गांधी समजून घेणे काळाची गरज आहे. गांधी आपल्याला सातत्याने प्रश्न विचारतात.  गांधीबाबत अनेक संभ्रम आहेत की गांधीजिनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बाजूला केले गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात वितुष्ट होते. गांधीजींनी भगतसिंग फासावर जाताना काहीच केले नाही. गांधीजी अल्पसंख्याकवादी होते. गांधी यांच्यामुळे फाळणी झाली. हे पाच प्रश्न कायम विचारले जातात. त्यामुळे, गांधी समजून घ्यायचे असतील तर या प्रश्नांमुळे निर्माण झालेले संभ्रम बाजूला ठेवावे लागतील आणि पूर्णतः अनभिज्ञ राहून गांधी समजून घ्यावे लागेल, तरच आपल्याला वास्तविक गांधी आपल्याला कळतील. आपला गांधीजींना विरोध असेल तर त्यांनी लिहिलेल्या साहित्याच्या आधारावर विरोध करण्याचे आपण धाडस करावे. कारण, गांधीजींनी आयुष्यातील बारीकसारीक गोष्टी लिखित रुपात मांडलेल्या आहेत.
वाचा सविस्तर news शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार

ते कायम म्हणायचे की, ‘जर तुम्हाला माझ्या दोन वक्तव्यात विरोधाभास वाटत असेल तर त्यांची तुलना करू नका. ते दोन्ही वक्तव्ये त्या त्या काळातील परिस्थितीनुसार करण्यात आलेली असावीत आणि मी दिवसेंदिवस प्रगल्भ होत असल्याने माझे विचारही कदाचित बदलत असतील.’ त्यामुळे, गांधीजी समजून घेताना या वक्तव्याचा आपल्याला कायम आधार घ्यावा लागेल, अशी भावनाही अण्णामलाई यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचीही त्यांनी उत्तरे दिली. प्रा. कविता सोनी यांनी सूत्रसंचालन केले.

वाचा सविस्तर news शासकीय कला महाविद्यालयाचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण


गांधीजींचे अनेक विरोधक होते पण कुणी शत्रू नाहीयावेळी अण्णामलाई यांनी गांधीजींच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचे कथन केले. ब्रिटिश सत्तेतील जनरल स्मिथ, लॉर्ड एर्विन आदी अधिकाऱ्यांशी त्यांचे असलेले संबंध किती वेगळे होते, यांची मांडणी करताना अण्णामलाई म्हणाले की, गांधीजींच्या मताशी, भूमिकेशी, विचारांशी सहमत नसलेले त्यांचे अनेक विरोधक होते. मात्र, त्यांचे एकही शत्रू नव्हते आणि जिथे शत्रुत्व नसते तिथे केवळ प्रेम असते. गांधीजींनी ही प्रेमाची भावना आयुष्यभर जपली. 
गांधीजी ‘लॉजिकल’ आणि ‘विज्ञानवादी’हीअण्णामलाई म्हणाले, गांधीजी रुढीवादी, परंपरावादी होते, असे म्हटले जाते. पण, गांधीजी ‘लॉजिकल’ आणि ‘विज्ञानवादी’ होते, हे आपण मान्य करायला हवे. त्यांनी अंतराळ अभ्यासाबाबत लेख लिहिले होते. विशेष म्हणजे, येरवडा तुरुंगात असताना ब्रिटिशांनी त्यांच्यासाठी दुर्बीनीची व्ययस्था करून ठेवली होती. ज्यांच्या आत्मचारित्र्याच्या शिर्षकातच ‘प्रयोग’ हा शब्द होता, यावरूनच आपल्याला त्यांचा विज्ञानवाद लक्षात घ्यायला हवा.
आजची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी गांधीजींचे अर्थशास्त्र महत्वाचेचआजच्या भांडवलवादी उत्पादन काळात गांधीजींचे अर्थविषयक विचार किती महत्वाचे आहे, असा प्रश्न एमजीएमचा विद्यार्थी अजय धनजे याने केला. त्यावर अण्णामलाई म्हणाले, आजच्या महामारीच्या काळात खऱ्या अर्थाने गांधीजींच्या अर्थविषयक विचाराची गरज आहे. कारण, काहीच श्रीमंतांच्या हाती संपूर्ण भांडवलशाही असणे आणि दुसरीकडे गरीब कायमच गरीब, ही व्यवस्था खूप घातक आहे. गांधीजींच्या विचारात अशी व्यवस्था कधी नव्हती. त्यामुळे, आजची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने रुळावर आणण्यासाठी गांधीजींचे अर्थविषयक विचार फार महत्त्वाचे आहेत.
हेही वाचा देवेंद्र फडवीस यांच्या प्रयत्नांना यश, अण्णा हजारे यांनी मागे घेतला उपोषणाचा निर्णय

महात्मा गांधी यांना सांगीतिक अभिवादनऔरंगाबाद: एमजीएम मध्ये महात्मा गांधी यांना स्मृति दिनानिमित्त  अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम ,  विश्वस्त प्रताप बोराडे,   कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे कुलसचिव आशिष गाडेकर, गांधी अभ्यासक मार्क लिंडले,  डीन डॉ. रेखा शेळके  डॉ. एच. एस. शिंदे,  शुभा महाजन यांची उपस्थिती होती. याप्रसंगी  मान्यवरांनी चिंतनगाह  येथील गांधी यांच्या पुतळ्याला  सूतमाला अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी गांधीजींना प्रिय असलेल्या रचना  ‘ओम तत्सत श्री नारायण’,  ‘वैष्णव जण तो तेणें कहिये’ , ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ आणि ‘रघुपती राघव राजाराम’  प्रस्तुत करण्यात आल्या. विविध इन्स्टिट्यूटचे प्रमुख आणि प्राध्यापक विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. श्रीकांत गोसावी, संतोष धुमाळ, गजानन धुमाळ,  भाऊसाहेब हजारे, कृतांजली पाटील श्रुती बहिरगावकर यांनी गीत आणि वाद्यसाठी साथसंगत केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close