Subscribe to our Newsletter
क्राईम

गौताळा अभयारण्याच्या शासकीय वाहनाची जाळपोळ चार लाखाचे नुकसान ,अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

कन्नड -कल्याण पाटील  

 गौताळा अभयारण्याच्या.साह्यक  वन्यजीव रक्षक हिवरखेडा गौताळा यांच्या निवासस्थानावर  अज्ञाताने सोमवार दि.26 रोजी पहाटे तीन वाजेदरम्यान दगडफेक करुन गस्तीवाहनाला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली.याबाबत अधिक माहिती अशी कीअभयारण्याच्या हिवरखेडा गौताळा येथील शासकीय निवासस्थानात साहाय्य वन्यजीव रक्षक  राहुल शेळके आणि नागद सहाय्यक वन्यजीवरक्षक सागर ढोले हे राहतात.सागर ढोले हे कुटुंबियांसमवेत शासकीय निवासस्थानात वास्तव्यास आहे.दि.,25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता दसरा सना निमित्त शासकीय वाहणावरील खाजगी चालक बळीराम महारु राठोड यांनी शासकीय निवासस्थानासमोर वाहन उभे करून निघून गेले. सोमवार दि.26 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास निवसस्थानाच्या गच्चीवर दगडाचा आवाज आल्याने त्यांना जाग आली.   त्यांच्या निवासस्थानावर अचानक दगडफेक सुरु झाल्याने दोन्हीही अधिकारी धास्तावले तसेच श्री.ढोले यांचा शेळके यांना फोन आला बाहेर दगडाचा आवाज येत आहे तुम्ही बाहेर पडू नका, तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना फोन करून बोलावून घ्या.त्यानंतर चालक राठोड वनरक्षक एस आर देशमुख, दीपक सोनार व लटपटे आदी कर्मचारी निवस्थानाबाहेर आल्या नंतर शेळके आणि ढोले घराबाहेर आले असता शासकीय वाहन एम एच 20, सी यु 0326 हे जळताना आढळून आले.बाजूला असलेल्या बोअर ची मोटार सुरू करून वाहन विझवण्याचा प्रयत्न केला यात वाहनाचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. .त्यांनी शहर पोलीस ठाणे,तहसिलदार संजय वारकड यांना  घटनेची माहिती दिली.दगडफेकीमुळे दोघेही अधिकारी निवासस्थानाबाहेर आले नाहीत. या दरम्यान निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या गस्ती वाहनाला  आग लावून आरोपी फरार झाले.सकाळी सहाय्यक वन्यजीवरक्षक अधिकारी राहुल शेळके यांनी कन्नड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच विभागीय वनाधिकारी व्ही एन सातपुते ,साह्यक वनसंरक्षक सचिन शिंदे ,एस पी काळे , राजेंद्र नाळे ,  वनपरीक्षेत्र अधिकारी अण्णासाहेब पेरकर , आनंद गायके ,संऊ भिसे ,शहर पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो. नि. बालाजी वैद्य हे पुढील तपास करीत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close