Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

नाथसागराचे चार दरवाजे उघडले ३६८५ क्यूसेक पाण्याचा गोदावरी नदीपात्रात विसर्ग

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com


पैठण / किरण काळे

मराठवाड्याला वरदान असणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणीपातळी झपाटयाने वाढ झाल्यामुळे जायकवाडी धरणात ९८ टक्के जलसाठा झाला आहे.त्यामुळे शनिवारी दुपारी गेट क्र.१०,२७ हे दोन दरवाजे अर्ध्या फुटाने उचलण्यात आले होते.त्यानंतर पुन्हा शनिवारी सायंकाळी ७ वाजता दरवाजा क्र,१८,१९ हे दोन दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून १०४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे.सद्या स्थितीत द्वार क्रं. १०,१८,१९,२७ मधून २०९६ क्यूसेक व जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्यूसेक इतका असा एकुण ३६८५ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात आला आहे.शनिवारी दुपारी जायकवाडी धरणाचे क्र.१० व २७ हे दोन दरवाजे अर्धा फूटाने वर उचलून जायकवाडी धरणातून १०४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला.त्यानंतर धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत जलसाठा ९८ टक्क्यावर पोहचला असल्याने शनिवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास दरवाजा क्रमांक १८ व १ ९ हे दोन दरवाजे अर्ध्या फूटाने वर उचलून विसर्ग वाढविण्यात आला.राज्यस्तरीय धोरणानुसार आखलेल्या जलाशय प्रचलन आराखड्या नुसार जलाशयाची पाणीपातळी पुढे सरकल्याने जायकवाडी प्रशासनाने आवक होत असलेल्या पाण्याच्या तुलनेत अर्धे पाणी धरणातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.




Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close