Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादशेतीविषयक

हतनूर येथे बिबटसदृश्य शेत शिवारात शेतकऱ्यांना सतर्कतेचे वनविभागाचे आवाहन


कल्याण पाटील mh20live network

 कन्नड – तालुक्यातील मौजे हतनुर शेत शिवारात बिबट  दर्शनाची वार्ता  पसरताच सर्वत्र शेतकरयात खळबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील मौजे हतनूर शिवारात दिनांक ३ नोंहेबर रोजी बिबटसदृश्य  पगमार्कची चौफेर पाहणी  कन्नड प्रादेशिक  वनपरिक्षेत्र अंतर्गत वनाधिकारी, वन कर्मचारी यांनी केली . तेव्हा वनकर्मचारयांना बिबटसदृश्य भागात   वन्य प्राण्याचे पावलाचे ठसे व पगमार्क स्पष्ट दिसून आले नाही. तसेच आजूबाजूच्या शेत शिवारात काम करत असलेल्या शेतकऱ्यांना सतर्क राहणे बाबत कळविले. तदनंतर हतनूर ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात मानव -बिबट संघर्ष जनजागृतीपर माहिती दिली. यावेळी  उपसरपंच रघुनाथ गायकवाड ,   ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरीक उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच साहयक वनसंरक्षक सचिन शिंदे , वनपरीक्षेत्र अधिकारी ए.आर .पेहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली  घटनास्थळी पाहणी पथकात वनपरिमंडळ अधिकारी  प्रवीण कोळी , शीघ्र कृती दल औरंगाबाद चे वनरक्षक  अमोल वाघमारे एस.एम. माळी वनसेवक सईद शेख आदींचा समावेश होता.वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या   मार्गदर्शनाखाली  बिबटप्रवण स्थळी वनकर्मचारी गस्त करीत असून शेतकऱ्यांनी शेतीकाम करताना सावधगिरी बाळगावी अफवांवर विश्वास ठेवू नये. बिबट संबंधी काहीही वार्ता प्राप्त झाल्यास त्वरीत वनविभागास कळवावे  असे आवाहन कन्नड वनपरीक्षेत्र अधिकारी ए.आर.पेहेरकर  यांनी केले आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close