Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

अगोदर चूल पेटवा मगच संप – पद्मश्री लक्ष्मणराव माने

ऊसतोड कामगारांच्या न्याय हक्कासाठी केली राष्ट्रवादी ऊसतोड कामगार व मुकादम संघटनेची घोषणा

बीड / mh20live Network गेल्या सहा महिन्यापासून लॉक डाऊन मुळे ऊसतोड कामगार आपल्या गावी घरी बसले असल्याने त्यांच्या हाताला कसलेही काम नाही. हातावरचे पोट असलेल्या ऊसतोड कामगारांना आपल्या कुटुंबाची खळगी भरण्यासाठी कारखान्यावर जाणे नितांत आवश्यक आहे. मात्र काही संघटनांनी कारखाने सुरू होण्याच्या अगोदरच संप पुकारल्याने ऊसतोड कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अगोदर ऊसतोड कामगारांच्या पोटाचा प्रश्न मिटवा आणि नंतरच संपाची मिशाल पेटवा असे आवाहन करत ऊसतोड कामगारांना कामगार म्हणून शासन दरबारी न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी ऊस तोड कामगार व मुकादम संघटनेची घोषणा करीत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार तथा भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मणराव माने यांनी केले आहे.बीड येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत प्रसंगी बोलताना पद्मश्री लक्ष्मण माने म्हणाले की, गेल्या सहा महिन्यापासून कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. सर्वच व्यवसाय बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या उपासमारीतून ऊसतोड कामगार देखील सुटलेला नाही. हातावरचे पोट असलेल्या ऊसतोड कामगाराला कारखान्यावर जाणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र काही संघटनांनी कारखान्यावर जाण्या अगोदरच संप पुकारल्याने ऊसतोड कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अगोदर मजुरांना कारखान्यावर जाऊ द्या, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न महिना पंधरा दिवसांचा सोडवणूक होऊ द्या, त्यानंतर संप करा. आम्ही देखील त्या संपामध्ये सहभागी होऊ असा सज्जड इशारा पद्मश्री लक्ष्मणराव माने यांनी दिला आहे.आज पर्यंत कित्येक संघटनांनी ऊसतोड कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ऊसतोड कामगार यांना आज पर्यंत कामगार म्हणून मान्यता मिळालेली नाही. कारखानदार त्यांना आपले नोकर समजत नाहीत. आणि शासन दरबारी ही त्यांची कामगार म्हणून नोंद नाही. केवळ वेट बिगारी आणि गुलाम म्हणून ऊसतोड कामगारांचे जीवन व्यतीत होत आहे. ऊस तोड कामगार नेमके नौकर कुणाचे? असा प्रश्न उपस्थित होत असून या ऊसतोड कामगारांचे मालकतत्व एक तर कारखान्याने स्वीकारावे अन्यथा शासनाने स्वीकारावे. जेणेकरून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होईल. आजपर्यंत ऊसतोड कामगारांचे नेतृत्व सर्व पुढाऱ्यांनी केले आहे, त्यामुळे ऊसतोड कामगारांची व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. एकही ही ऊसतोड कामगारांने संघटनेचे नेतृत्व केले नसल्याने ऊसतोड कामगारांचे केवळ शोषण आजपर्यंत झाले आहे. श्रमिकांची कायदे त्यांना लागू झाले नाहीत. त्यांच्या मुलांची शिक्षणाची व्यवस्था कोणी करू शकले नाही. सहा महिने कारखान्यावर राबराब राबून नंतर गावाकडे गेल्यानंतर त्यांचे होणारे हाल आजपर्यंत कोणत्याही संघटनेला दिसले नाहीत. हॉटेल वर काम करणाऱ्या नोकराला सुद्धा कामगार म्हणून दर्जा आहे. मात्र ऊसतोड कामगारांची आज पर्यंत कोणत्याही प्रकारची नोंदणी झालेली नाही. ती नोंदणी राष्ट्रवादी ऊस तोड कामगार व मुकादम संघटनेच्यावतीने आम्ही करणार असून त्यांना न्याय देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करणार आहे.ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करणारे सर्वच प्रस्थापित असून त्यांच्या व्यथा जाणू शकत नाहीत. त्यामुळेच ऊसतोड कामगारांना आजपर्यंत श्रमिकांची कायदे लागू झाले नाहीत. माझी सध्या संपर्क करणाऱ्यांना कळकळीची विनंती आहे, अगोदर ऊसतोड कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवा. आणि त्यानंतरच संपाची सुरुवात करा आम्ही तुमच्या सोबत राहूत. पण जर स्वतःच्या आणि कुटुंबियाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कारखान्यावर जाणाऱ्या ऊसतोड कामगारांना रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल. असेही पद्मश्री लक्ष्मणराव माने यांनी यावेळी सांगितले. यावेळी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष गंगाधरराव पुरी, मराठवाडा संपर्क प्रमुख शंकर जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

ReplyForward
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close