Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

चित्रपट निर्मिती केवळ आता केवळ पुण्या-मुंबईची मक्तेदारी नाही – आमदार अंबादास दानवे

“बाबा” लघुपटाच्या पोस्टरचे आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते दिमाखात विमोचन

औरंगाबाद | दि. २६

चित्रपट निर्मिती हि केवळ पुणे-मुंबई च्या कलाकारांची मक्तेदारी राहिली नाही. औरंगाबाद जिल्ह्यातही चांगले कलाकार असून सर्वसामान्य माणूसहि या कला क्षेत्रात आता उतरून यशस्वी होऊ शकतो. असे मत शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. किशोर सूर्यवंशी लिखित व सचिन ठोकळ दिग्दर्शित “बाबा” या लघुपटाच्या पोस्टर चे विमोचन आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते सोमवारी (दि.२६) करण्यात आले.

शहरातील आदर्श प्रोडक्शन एम एच २० च्या वतीने स्री भ्रूण हत्येंवर आधारीत शेतकऱ्याचे कथानक असलेल्या “बाबा” या लघुपटाची निर्मिती करण्यात येत आहे. यावेळी संपादक अनिल सावंत, व्यवस्थापक प्रशांत सुर्यातळे, परळी वैजनाथ चे नगरसेवक सचिन कागदे, भाजपचे वरिष्ठ नेते रत्नाकर म्हस्के, डिफेन्स करिअर अकादमी चे सचिन महाले, अमित ठाकरे, युवा नेते दीपक म्हस्के, लेखक किशोर सूर्यवंशी, लघुपटाचे समन्वयक अविनाश चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती होती. पोस्टर विमोचन प्रसंगी आमदार अंबादास दानवे म्हणाले कि, या लघुपटातून शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला असून स्री भ्रूण हत्येंवर आधारीत शेतकऱ्याचे कथानक असलेल्या “बाबा” या लघुपटास आमदार अंबादास दानवे यांनी शुभेछ्या दिल्या. भविष्यात समाजातील विविध घटनेवर आधारीत चित्रपटाची निर्मिती आदर्श प्रोडक्शन ने करावी अशी अपेक्षा आमदार दानवे यांनी यावेळी व्यक्त केली. प्रशांत सूर्यतळे म्हणाले कि, समाजातील वास्तविक घटना चित्रपटातून साकारणे हे एक मोठे आव्हान असते त्यामुळे दिग्दर्शक आणि लेखकामध्ये चांगला समन्वय असावा लागतो. या चित्रपटातील सर्व कलावंतानी मेहनतीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. डिफेन्स करिअर अकादमी चे संचालक सचिन महाले म्हणाले कि, आदर्श प्रोडक्शन ने विविध चित्रपटाची निर्मिती करून देशभरात होणार्या विविध लघुपट महोत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवावा. भविष्यातील विविध चांगल्या चित्रपट निर्मितीसाठी त्यांनी शुभेछ्या आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.

आदर्श प्रोडक्शन च्या वतीने लवकरच डान्स क्लास ची सुरुवात करण्यात येणार असून या डान्स क्लास चे उद्घाटन आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनेता आकाश ठोकळ यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. या चित्रपटात किशोर सूर्यवंशी, सचिन ठोकळ, सचिन अंभोरे, मनोज पगारे, आकाश ठोकळ, साक्षी राठोड, मानसी शेवाळे, सुनिता शेवाळे, ज्ञानेश्वर तुपे, अमोल मगरे, रोहित मोतीचूर, व्यंकटेश बाविस्कर, राजू जाधव, आदित्य सोनवणे, आदींच्या भूमिका आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात लघुपटातील सर्व कलावंताना शुभेछ्या दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लघुपटाचे दिग्दर्शक सचिन ठोकळ यांनी केले तर सुत्रसंचालान सचिन अंभोरे यांनी केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close