Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

सोयाबीन बियाणे उगवण झाली नसल्याने संबंधित सोयाबीन कंपनीवर कृषीदुकानावर गुन्हे दाखल करा

नायगाव ता./ शेषेराव कंधारे
नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कृषी दुकानदारांकडून चांगल्या, नामांकित कंपनीची १.ईगल २.ग्रीन गोल्ड ३.महामंडळ ४.जानकी ८८ ५.समर्थ ६.हिरामोती ७.संजय सिड्स ८.कुबेर या कंपन्याचे सोयाबीन बियाणे खरेदी करून शेतात सोयाबीनची पेरणी केली होती, परंतु पेरणीला आठ दिवस उलटून गेल्यावर ही सोयाबीन बियाण्याची उगवण झालीचं नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अगोदरच मोठ्या संकटाना सामोरे जात शेतकऱ्यांनी पेरणी केली. याबाबत बियाणे न उगवण्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी कृषी विभाग व पंचायत समितीकडे केल्या असून यामध्ये अनेक सोयाबीनच्या कंपन्याचे बियाणे डबल लेबल सर्टिफाईड असूनही शेतकऱ्यांनी पेरलेली बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागत आहे, शेतकऱ्यांना बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित सोयाबीन उत्पादक कंपनी व कृषी दुकाणदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून व संबंधित कंपनीकडून प्रति बॅग रक्कम, पेरणीचा सर्व खर्च त्वरित उपलब्ध करून देऊन शेतकर्याना दिलासा द्यावा अशी मागणी नायगावचे तालुका कृषी अधिकारी काळे साहेब यांच्याकडे केली आहे. त्यांच्यावर कठोर तात्काळ कार्यवाही करावी व अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नायगाव व शेतकर्याच्या वतीने तीव्रं आंदोलन करण्यात येईल.
टिप ÷ १) कृषी दुकाणदारने ज्या बॅगा पुर्वी २००० रू विकले त्या बॅगाची मागणी वाढल्यानंतर त्याचं बॅगा दुकाणदारांनी ३०० रू वाढ करून विकले.
२) ज्या बॅग बाजारामध्ये विकल्या गेल्या आहेत त्यांचे अहवाल पेरणीचं झाली पण अजूनपर्यंत अहवाल आलेला नाही. मग त्या बॅगा बाजारात विकल्या कश्या याला जबाबदार कोण आहे.?
३) बाजारामध्ये जे बियाणे आले ते बोगस बी कुठून आले.? उत्पादन कंपनी, कृषी असोशियन, दुकानदार व कृषी अधिकारी यांची मिलीभगत आहे का.?अशी मागणी नायगाव तालुका कृषि अधिकारी काळे साहेब यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ता.अध्यक्ष भास्कर पाटील भिंलवडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे गजानन पाटील होटाळकर यांनी केली आहे.
यावेळी उपस्थित श्याम पाटील चोंडे,माधव कोरे नरसीकर, सुशिल पाटील पवार, माधव पाटिल बेंद्रीकर, अभिजीत पा पवार, संदिप पा कल्याण, प्रकाश हनमंते यावेळी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close