Subscribe to our Newsletter
Loading
ब्लॉग्ज

समाजरत्न पुरस्काराचे वैशिष्ट्यं, नामदेवराव देसाई

समाजरत्न पुरस्कारप्राप्त ( ग्रामीण साहित्यिक )

*दुपारची वेळ, मोबाईलची रिंग वाजली,
“हँलो, “मी म्हणालो,
“नामदेवराव देसाई, बोलताय? “
“बोलतोय, आपण कोण बोलताय “मी म्हणालो,
अभिनंदन सर, आपणास साहित्य क्षेत्रातील कार्यासाठीचा समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे, “तो म्हणाला,
“आपण कोण बोलताय? ” मी गोंधळून म्हणालो,
मी सुरज ,सुरज सूर्यवंशी बोलतोय सर , नागेबाबा उद्योग समूहाच्या प्रेरणेने व
महाराजा, सामाजिक प्रतिष्ठान। सोशल सर्विस फाऊंडेशन या संस्थेच्या निवड समितीने समाजरत्न पुरस्कारासाठी आपली एकमताने निवड केली
आहे, ” तो म्हणाला,
मी सावध झालो, या पुर्वीही असे बरेच फोन व पत्रं आले होते, अमुक ईतकी रक्कम पाठवा तुम्हाला अमुक तमुक पुरस्कार देण्यात येईल, पैसे घेऊन पुरस्कार विकण्याचा काही लोकांनी धंदा सुरू केला आहे, अशा आँफर्स मी नाकारल्या आहेत,
“बर मग माझ्या कडून काय अपेक्षा आहेत, “मी सावधपणे विचारले,
“आपण हा पुरस्कार स्विकारावा व कार्यक्रमाला उपस्थित रहावे ही विनंती आहे, पद्मश्री डाँ, रविंद्र कोल्हेजी प्रमुख अतिथी आहेत, बाकी तपशील नंतर कळवतो, अभिनंदन सर “तो म्हणाला,
मला आश्चर्याचा धक्का बसला, मी समक्ष भेटायला जाऊन निर्णय घेण्याचे ठरवले,
सुरज सूर्यवंशी आणि महाराजा केटरर्सचे रामपाल पांडे व जयेश सावंत यांची भेट झाली, आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला, या ध्येयवादी मंडळींनी गतवर्षी पासून हा उपक्रम सुरू केला होता,समाजातील विविध क्षेत्रात निरलस पणे काम करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांचा व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो, त्यांचेवर प्रसिध्दीचा प्रकाश झोत टाकण्यात येतो,
ही कल्पना सुरज व त्यांच्या तरुण मित्रांची, चंगळवादी वातावरणात अडकलेल्या तरुणाईत असा सामाजिक व विधायक विचार करणारे तरुण पाहून मला खूप आनंद झाला,
सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही, पण या ध्येयवादी तरुणांच्या मागे नागेबाबा मल्टीस्टेटचे कडूभाऊ काळे, सुरेश दादा वाबळे, प्रभातचे किशोर नाना निर्मळ, बबणराव तागडसर अशी मातब्बर मंडळी ऊभी राहिली, आणि स्वप्न साकार झाले,
खिशात दमडा नसतांना अशी स्वप्ने पाहणे आणि ती प्रत्यक्षात आणने ही गोष्ट सोपी नाही, पण सुरज, रामपाल पांडे आणि त्यांच्या तरुण मित्रांनी यशस्वी करून दाखविली,
पुरस्कार देणार्या अनेक संस्था आहेत,विशेषतः सामाजिक संस्था गाजावाजा करीत विविध क्षेत्रातील मान्यवरांना असे पुरस्कार जाहीर केले जातात, त्यातले काही पुरस्कार वडलाच्या, आजोबांच्या नावांनी दिले जातात, पुरस्कार कुणाला द्यायचे याचेही गणित ठरलेले असते, प्रमुख अतिथी बोलावतांना संस्थाचालकाना फायदेशीर ठरेल असा राजकीय नेता निमंत्रित केला जातो, पुरस्कार समारंभाची अमाप प्रसिद्धी केली जाते,
तरीही अशा पुरस्कारांचे स्वागतच आहे,
या पार्श्वभूमीवर सुरज आणि त्यांच्या संस्थेने दिलेल्या पुरस्काराला दाद द्यावीशी वाटते, पुरस्कारार्थींची निवड अतिशय निर्लेप पध्दतीने करण्यात येते ,व निवड झाल्यानंतर जाहीर करण्यात येते, निवड समितीची नावे शेवट पर्यंत कुणाला कळत नाहीत,
पुरस्कार समारंभाचे वेगळेपण ही अधोरेखीत करणे गरजेचे आहे, संध्याकाळची वेळ, रम्य संधीप्रकाश, ऊत्सव मंगलकार्यालयाची हिरवळ, भव्य व्यासपीठ, नेटकी सजावट, मंद प्रकाश योजना, समोर ऊत्तम बैठक व्यवस्था ,कुठेही गडबड गोंधळ नाही, सर्व संयोजक स्वागता साठी ऊभे ,निवेदिकांच्या नम्र सूचना, हळू हळू मान्यवरांचे आगमन, निवडक पुरस्कारार्थिंचे मनोगत,
मेळघाटात आदिवासी साठी आयुष्य पणाला लावणारे पद्मश्री डाँ, रविंद्र कोल्हे यांचे आगमन होते, अतिशय साधेपणा, नम्र आणि मृदू,व्यासपीठावर संयोजक व प्रमुख अतिथींचे आगमन होते, रामपाल पांडे स्वागत करतात, सुरज सूर्यवंशी पुरस्काराची पार्श्वभूमी सांगतात, पुरस्कारार्थींचे प्रतिनिधी म्हणून काका कोयटे थोडक्यात पण मनस्वी मनोगत व्यक्त करतात, मेळघाटाचे ऋषीं पद्मश्री डाँ, रविंद्र कोल्हे यांचे हृदयस्पर्शी मनोगत ऐकताना अंगावर काटा उभा राहिला,
ईतर कुणाचेही भाषण न होता पुरस्कार सोहळा संपन्न होतो, मिष्टान्नभोजनाचा आस्वाद घेऊन प्रसन्न चित्ताने सर्व जण मार्गस्थ होतात,
सामान्य माणसांनी संपन्न झालेल्या केलेला असा हा असामान्य पुरस्कार सोहळा आहे, अशा ध्येयवादी तरुणांच्या पाठिशी ऊभे असलेल्या सेवाभावी कार्यकर्त्यांनी या परस्काराचे मोल हजार पटीने अधिक नाढवले आहे, मीही स्वतःला भाग्यवान समजतो आहे, धन्यवाद!

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close